मुंबई : ‘कोरोना व्हायरस’ने जगभर घातलेले थैमान कायम आहे. कालच्या दिवसात (9 एप्रिल) 7 हजार 183 रुग्ण दगावले. जगातल्या एकूण मृतांचा आकडा 96 हजारांवर पोहोचला आहे. अमेरिकेत काल 1858 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबई-पुण्यापासून अमेरिका-इटलीपर्यंत ‘कोरोना’ची कुठे काय स्थिती आहे, याचा हा आढावा (Corona Cases in World Update)
जगात काय स्थिती?
-जगभरात काल 7 हजार 183 कोरोना रुग्ण दगावले
-जगातल्या मृतांचा एकूण आकडा 96 हजारांवर
-जगभरात काल तब्बल 84 हजार 215 नवे रुग्ण समोर
-जगभर कोरोनाचे 16 लाखांहून अधिक रुग्ण
अमेरिकेत कोरोनाचे थैमान
-अमेरिकेत कोरोनामुळे काल 1 हजार 858 रुग्णांचा मृत्यू
-अमेरिकेत काल कोरोनाचे 33 हजार नवे रुग्ण समोर
-अमेरिकेत सर्वाधिक 4 लाख 68 हजार रुग्ण
-मंगळवारी 1,971; बुधवारी 1940; तर गुरुवारी 1,858 ‘कोरोना’बळी
युरोपीय देशांमध्ये कोरोनाची स्थिती
-फ्रान्समध्ये मृतांचा आकडा वाढताच
-फ्रान्समध्ये काल एका दिवसात 1341 रुग्ण दगावले
-फ्रान्समध्ये आतापर्यंत 12 हजार 210 रुग्णांचा मृत्यू
-फ्रान्समध्ये एकूण रुग्णसंख्या 1 लाख 18 हजार
-ब्रिटनमध्येही काल 881 ‘कोरोना’बळी
-एकूण मृतांचा आकडा 8 हजारांच्या जवळ
-65 हजार ब्रिटीशांना कोरोनाची लागण
-इटली, स्पेन, जर्मनीत मृतदेहांचा खच
-काल इटलीत 610, स्पेनमध्ये 655 मृत्यू
-जर्मनीत 258 रुग्णांचे कोरोनामुळे प्राण गेले
-स्पेनमध्ये एकूण 1.53 लाख, तर इटलीत 1.43 लाख रुग्ण
(Corona Cases in World Update)
भारतात रुग्ण वाढतेच
-देशभरात काल कोरोनाचे 61 बळी
-देशभरातल्या कोरोनाबळींचा एकूण आकडा 227 वर
-कोरोना रुग्णांची एकूण संख्याही 6 हजार 738 वर
-भारतात काल 781 नवे रुग्ण समोर
Increase of 547 new COVID19 cases 30 deaths in last 12 hours; India’s total number of #Coronavirus positive cases rises to 6412 (including 5709 active cases, 504 cured/discharged/migrated and 199 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/N9fLxsqy4a
— ANI (@ANI) April 10, 2020
महाराष्ट्रात फैलाव वाढला
-महाराष्ट्रात काल सर्वाधिक 229 नवे रुग्ण
-राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,364 वर
-महाराष्ट्रात काल कोरोनाचे 25 बळी
-राज्यात कोरोनाबळींची संख्या 97 वर
-पुणे विभागात कोरोनाग्रस्तांची संख्या 246 वर
-काल 7 रुग्ण दगावले तर 53 नवे रुग्ण समोर
-पुणे विभागातील मृतांचा आकडा 25 वर
-मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 857 वर
-मुंबईत एकूण 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
-मुंबईत काल 143 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
-कोरोनासंबंधी मुंबईतून धक्कादायक बातमी
-लहान मुलेही कोरोनाच्या विळख्यात
-कोरोनाच्या रुग्णांमध्ये 21 चिमुरडे
-1 ते 10 वयोगटातल्या 21 मुलांना संसर्ग
-11 ते 20 वयोगटातही 56 मुलांना कोरोना
-विदर्भात काल एका दिवशी 22 नवे रुग्ण
-अकोल्यात सर्वाधिक 11 नवे रुग्ण
-नागपुरात 6, बुलडाण्यात 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
(Corona Cases in World Update)