नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा 10 लाखाच्या पलिकडे गेला आहे. त्यातच आता भारताची काळजी वाढवणारी माहिती समोर येत आहे. भारतात कोरोनाच्या समुह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) केला आहे (Corona Community spread in India claim IMA). त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोना संसर्गाची स्थिती अधिक गंभीर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. समुह संसर्गाच्या स्थितीत संसर्ग झालेल्या व्यक्तीला कुणाकडून आणि कोठे संसर्ग झाला याचा तपास करणे अशक्य होते आणि त्यामुळे संसर्गाचा वेगही वाढतो.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आयएमएचे प्रमुख व्ही. के. मोंगा यांनी म्हटलं, “भारतात कोरोना आता धोकादायक वेगाने वाढत आहे. दररोज जवळपास 30 हजार रुग्णांची नोंद होत आहे. भारतासाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोना संसर्ग आता भारताच्या अगदी ग्रामीण भागातही पोहचला आहे. हे भारतासाठी चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील कोरोना संसर्गावरुन समुह संसर्गाला सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत आहे.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
कोरोनाच्या नव्या हॉटस्पॉटचा धोका वाढला
मोंगा म्हणाले, “दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना संसर्गाला अद्याप नियंत्रणात केले जात आहे. मात्र, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेशच्या अंतर्गत भागातही नवे कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजे.”
मागील 3 दिवसांपासून दररोज 30 हजार कोरोना रुग्णांची वाढ
Highest single day spike of 38,902 cases and 543 deaths reported in India in the last 24 hours.
Total #COVID19 positive cases stand at 10,77,618 including 3,73,379 active cases, 6,77,423 cured/discharged/migrated and 26,816 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/u8im5qLQcI
— ANI (@ANI) July 19, 2020
भारतात मागील सलग 3 दिवसांपासून दररोज कोरोना संसर्ग झालेल्या 30,000 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे. यासोबतच एकूण कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 77 हजार 618 पर्यंत पोहचली आहे. यात 26 हजार 16 कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 6 लाख 77 हजार 423 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्तही झाले आहेत. देशात सध्या 3 लाख 73 हजार 379 कोरोना सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
संबंधित व्हिडीओ :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव, तिघांना संसर्ग, एकाचा मृत्यू
Corona Update | राज्यात तीन दिवसात 25 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार
Corona Vaccine | कोरोनाच्या लसीचा फॉर्म्युला चोरण्यासाठी हॅकिंग, रिसर्च लॅब अलर्टवर
Corona Community spread in India claim IMA