उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाची ठिकाणं बंद करण्यात येत आहेत. राज्यातील अनेक मंदिरं खबरदारीसाठी (Corona Effect Temple Closed) बंद करण्यात येत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिर्डीचं साई मंदिर यासह राज्यातील सर्व मोठी मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई (Corona Effect Temple Closed) तुळजाभवानी देवीचे मंदिर आज पहाटे 5 वाजता विधिवत पूजा करून भाविकांसाठी दर्शनासाठी बंद करण्यात आले. आजपासून देवीचे मंदिर सरकारचे पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. तुळजाभवानी देवीची (Corona Effect Temple Closed) चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे.
देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी धार्मिक विधी आणि पूजा या महंत आणि पुजारी यांच्याकडून केल्या जाणार आहेत. कोरोना आजारामुळे गर्दी टाळण्यासाठी मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : Corona | रुग्णांचा विलगीकरणाचा संपूर्ण खर्च सरकारचा, हॉटेलमध्येही राहण्याची व्यवस्था : उद्धव ठाकरे
आज पहाटे 5 वाजता देवीची पूजा करण्यात आली आणि त्यांनतर सर्व भक्तांच्या वतीने देवीच्या मूर्तीवर एक अभिषेक घालण्यात आला. कोरोना आजार दूर व्हावा यासाठी देवीला साकडे घालण्यात आले.
कोरोनाचा वाढता धोका पाहता राज्यातील गर्दी होईल अशी सर्व ठिकाणं बंद करण्याच्या सूचना सरकारने केल्या. त्यानंतर राज्यातील अनेक प्रसिद्ध मंदिर संस्थानांनी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या पुढील आदेशापर्यंत राज्यातील अनेक मंदिरं हे (Corona Effect Temple Closed) बंद राहणार आहेत.
राज्यातील कुठली मंदिरं बंद राहणार?
शिवाय, राज्यातील काही मंदिर संस्थानांनी मंदिरं पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. शेगावच्या संत गजानन महाराजांचा रामनवमी उत्सव रद्द करण्यात आला आहे. मात्र, गजानन महाराजांचे मंदिर हे भक्तांसाठी सुरु राहणार असल्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे.
तर, पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अन्नछत्र बंद करण्यात आले आहे. भिवंडी शहरातील अय्यपा मंदिरचा 12 वा वर्धापन दिन सोहळा कोरोना (Corona Effect Temple Closed) विषाणूच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
संबंधित बातम्या :
ताश्कंदमध्ये भारतीय प्रवासी अडकले, शरद पवारांकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र
कोरोनावर उपाय सुचवा आणि 1 लाख जिंका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट
मंत्रालयातील अधिकाऱ्याच्या भाऊ-वहिनीला कोरोनाची लागण, अधिकारीही टेस्टसाठी कस्तुरबात दाखल