कोकणात ‘कोरोना’चा शिरकाव, दुबईतून रत्नागिरीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित

| Updated on: Mar 18, 2020 | 10:45 PM

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 45 वर पोहोचला (Corona Patient found Ratnagiri) आहे. दुबईतून रत्नागिरीत गेलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाली आहे.

कोकणात कोरोनाचा शिरकाव, दुबईतून रत्नागिरीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित
Follow us on

रत्नागिरी : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Corona Patient found Ratnagiri) आहे. पुणे, मुंबई, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, कल्याण या ठिकाणी कोरोनाचे रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नुकतंच रत्नागिरीत कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 45 वर पोहोचली आहे.

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 45 वर पोहोचला (Corona Patient found Ratnagiri) आहे. दुबईतून रत्नागिरीत आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाली आहे. कोकणातील हा रुग्ण 50 वर्षाचा आहे. त्यामुळे कोरोनाने कोकणातही शिरकाव केला आहे.

तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये एका 21 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेला हा व्यक्ती फिलिपाईन्स, सिंगापूर, कोलंबो या ठिकाणी प्रवास करुन आला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 19 वर पोहोचली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्याशिवाय मुंबईतही आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबई कोरोनाबाधितांचा आकडा 8 वर पोहोचला आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 11
  • पुणे – 8
  • मुंबई – 8
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • कल्याण – 3
  • नवी मुंबई – 3
  • रायगड – 1
  • ठाणे -1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1
  • रत्नागिरी – 1
  • एकूण 45

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • मुंबई (1) – 17 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
  • पुणे (1) – 18 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
  • मुंबई (1) – 18 मार्च
  • रत्नागिरी (1) – 18 मार्च
  • एकूण – 45 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • एकूण – 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Corona Patient found Ratnagiri

संबंधित बातम्या : 

शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी, रेल्वे, बसेसमध्ये प्रवासी क्षमता कमी करणार : मुख्यमंत्री

निम्म्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ न दिल्यास कंपनीवर कारवाई

Corona Virus : धक्कादायक! 167 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता, शोध सुरु