[svt-event title=”जीवनावश्यक वस्तुंचाच पुरवठा ऑनलाईन सेवेद्वारे व्हावा : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर” date=”13/04/2020,2:58PM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांनी फक्त जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. त्यासोबत ज्या संस्थांकडे औषध सेवा पोच करण्याचा परवाना असेल त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषधे देण्याची व्यवस्था करावी. सेवा देणाऱ्या डिलीव्हरी बॉयना जे पास दिले आहेत त्याचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असं आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. [/svt-event]
[svt-event title=”लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिक अडचणीत ” date=”13/04/2020,9:47AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिक अडचणीत आले आहेत. लॉकडाऊन होण्यापूर्वीच चार दिवस आधीच नाभिक संघटनांनी आपली दुकानं बंद केली होती. 27 दिवसांपासून सलूनची दुकाने बंद असल्यामुळे या व्यववसायिकांसमोर उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने नाभिक समाजाला मदत करा, अशी मागणी केली जात आहे. [/svt-event]
[svt-event title=”अहमदनगरमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी 6 लाख 19 हजार 143 विद्यार्थी यंदा थेट पुढच्या वर्गात” date=”13/04/2020,9:41AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगरमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी यंदा 4 हजार 968 शाळांमधील 6 लाख 19 हजार 143 विद्यार्थी यंदा थेट पुढच्या वर्गात जाणार आहेत. परीक्षा रद्द झाल्याने आता 1 ते 8 वी पर्यंतचे विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात जाणार आहेत. [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादमध्ये 7 वर्षीय चिमुरडीची कोरोनावर मात ” date=”13/04/2020,9:28AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये 7 वर्षीय चिमुरडीने कोरोनावर मात करत बरी झाली आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सात वर्षीय मुलीचे दोन्ही करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सात दिवसांपूर्वी आला या चिमुरडीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर करोना पॉझिटिव्ह मुलीचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. [/svt-event]
[svt-event title=”वर्ध्यात मॉर्निंग वॉक करणाऱ्या 55 लोकांवर पोलिसांची कारवाई” date=”13/04/2020,9:19AM” class=”svt-cd-green” ] वर्ध्यात सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉक करणाऱ्या 55 लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सकाळी वर्ध्याच्या रेल्वे स्टेशन, आर्वी नाका, शिवाजी चौक, विक्रमशिला नगर, सिविल लाइन या परिसरातील मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्रत्येकाकडून 500 रुपये प्रमाणे दोन लाख 75 हजार दंड वसूल केला आहे. [/svt-event]
[svt-event title=”कोरोनाबाधित रुग्णांचा मृतदेह नातेबाईकांच्या ताब्यात दिला जाणार नाही, आयुक्त दीपक म्हैसेकर यांची माहिती” date=”13/04/2020,9:14AM” class=”svt-cd-green” ] करोनाबाधित रुग्णांचे निधन झाल्यास संबंधित रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार नाहीत. त्या मृतदेहांवर गॅस किंवा विद्युत दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मृतदेह दफन करायचे असल्यास शहरापासून दूर अंतरावर सहा फूट खोल खड्डा खणून आणि त्यामध्ये र्निजंतुक लिक्विड टाकून मृतदेह प्लास्टिकच्या दोन बॅगांमध्ये दफन केले जाणार आहे, असं विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. [/svt-event]