[svt-event date=”09/04/2020,8:50AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : इचलकरंजी शहरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या शंभर ते सव्वाशे नागरिकांना पोलिसांनी पकडले, शहरातील डॉक्टर्स इंजिनिअर्स यांचा समावेश, शिवाजीनगर पोलीस 188 प्रमाणे सर्वांवर करणार गुन्हे दाखल, मॉर्निंग वॉकसाठी आलेल्यांमध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश, इचलकरंजी शिवाजीनगर पोलिसांची कारवाई [/svt-event]
[svt-event date=”09/04/2020,8:47AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : शहरात मृत्यू झालेल्या 68 वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले 15 जण निगेटिव्ह, मृत्यू झालेल्या 68 वर्षीय व्यक्तीवर सुरुवातीला मेयो या शासकीय रुग्णालयात सामान्य रुग्णांप्रमाणे झाले होते उपचार, मृत्यूनंतर तपासणी अहवालात कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती पुढे आली होती, त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी अशा 15 जणांची केली होती तपासणी, तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानं मेयो रुग्णालय प्रशासनाला मोठा दिलासा [/svt-event]
[svt-event date=”09/04/2020,8:46AM” class=”svt-cd-green” ] देशात कोरोना हॉटस्पॉटच्या संख्येत वाढ, यामुळे संचारबंदी हटविणे शक्य नाही, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे [/svt-event]
[svt-event date=”09/04/2020,8:43AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या दोन कोरोनाबाधितांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह, पेठवडगाव मधील महिलेसह पुण्याहून भक्तीपूजा नगरमध्ये आलेल्या पुरुषांचा अहवाल निगेटिव्ह, पेठवडगावच्या महिलेवर मिरजमध्ये तर पुरुषावर सिपीआरमध्ये उपचार सुरु, 14 दिवसांच्या उपचारानंतर दुसरी टेस्ट, एकाच दिवशी दोन बाधितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा [/svt-event]
[svt-event date=”09/04/2020,8:41AM” class=”svt-cd-green” ] बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 15 वर, नवीन 3 कोरोना संसर्गितांपैकी दोन शेगाव, तर एक खामगाव मधील चितोडा येथील असल्याची माहिती, जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती, जिल्ह्यात कालपर्यंत 12 कोरोना बाधित रुग्ण होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे, आज 10 जणांचे रिपोर्ट आलेत त्यातील 7 निगेटिव्ह तर 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, त्यामुळे जिल्ह्याचा आकडा आता 15 वर जाऊन पोहचला [/svt-event]
[svt-event date=”09/04/2020,8:39AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : व्हॉट्सअॅप ग्रूपवर आक्षेपार्ह पोस्ट भोवली, एका ग्रूप सदस्यावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अॅडमीनवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event date=”09/04/2020,8:37AM” class=”svt-cd-green” ] अकोला : शहरातील दुपारी 12 नंतर सर्व बंद, संचारबंदीचे निर्बंध अन्य भागांसाठीही कडक, सकाळी सहा ते दुपारी 12 पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहातील, सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत बॅंक सुरु राहील, या कालावधीतच नागरिकांना खरेदी करता येईल, दुपारी 12 नंतर केवळ दवाखाने आणि वैद्यकीय सुविधा, औषधी दुकाने सुरु राहतील [/svt-event]
[svt-event date=”09/04/2020,8:35AM” class=”svt-cd-green” ] पालघर : पालघर जिल्ह्यात अत्यावश्यक वाहनांशिवाय इतर वाहनांना पेट्रोल डिझल देण्यास मनाई, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन करत असल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय, सदर बाबतीत पेट्रोलपंप चालकांनाही आदेश [/svt-event]
[svt-event date=”09/04/2020,8:34AM” class=”svt-cd-green” ] यवतमाळ : इंदिरा नगर, गुलमोहर कॉलनी आणि भोसा रोड, मेमन कॉलनी, परिसर पूर्णपणे सील, जिल्हाधिकारी एम. डी. सिंग, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याकडून परिसराची पाहणी, हा भाग पूर्णपणे सील, याच भागातील 8 जण कोरोना पॉझिटिव्ह, परिसर निर्जंतुकिकरण करण्याचं काम सुरु [/svt-event]
[svt-event date=”09/04/2020,8:32AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद : कोरोनाग्रस्त रुग्णाचा उमरगा रुग्णालयात किळसवाणा प्रकार, कोरोनाबाधित रुग्ण गुळण्या करुन थुंकणे, वॉर्डातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, उमरगा पोलीस ठाण्यात रुग्णा विरोधात कलम 188, 269 प्रमाणे गुन्हा नोंद [/svt-event]