[svt-event date=”05/04/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ] पुणे : तब्लीगीच्या मेळाव्यातील अजून 22 जणांचा शोध सुरुच, पुणे विभागात आतापर्यंत 213 जणांना क्वारटाईन करण्यात आले, या 22 जणांचा पुणे पोलिसांकडून शोध सुरु, पुणे विभागाला आतापर्यंत 344 जणांची यादी मिळाली आहे, शुक्रवारी 163 तर शनिवारी 50 जणांना क्वारंटाईन करण्यात आले [/svt-event]
[svt-event date=”05/04/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] पुणे : कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांनी नायडू रुग्णालय भरलं, नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांना विलगिकरण करुन ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची शोधाशोध सुरु, पुण्यात आतापर्यंत एक हजार 259 जण दाखल [/svt-event]
[svt-event date=”05/04/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : लॉकडाऊनमुळे देशी दारु आणि विदेशी दारुची दुकानं, बार बंद असल्याने तळीरामांची पंचाईत, तळीरामांनकडून बिअर बार आणि दारु दुकानं टार्गेट, एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या भागात बारमध्ये चोरीच्या घटना, याआधी तीन ठिकाणी बार आणि दारुची दुकान फोडल्याचे प्रकार घडले, आतापर्यंत पाच ठिकाणी दारु दुकानात चोरी [/svt-event]
[svt-event date=”05/04/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] पुणे : लॉकडाऊनमुळे पुण्याच्या प्रदूषणात घट, या 10 दिवसात हवामानात मोठा बदल, शहरात आणि परिसरात नायड्रोजन ऑक्साईडचे प्रमाण सुमारे 40 टक्क्यांनी कमी, तर अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण सुमारे 20 टक्क्यांनी कमी, लॉकडाऊनमुळे शहरातील रस्त्यावर येणाऱ्या वाहनांचे प्रमाण 80 ते 90 टक्के कमी [/svt-event]
[svt-event date=”05/04/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ] पुणे : वृत्तपत्र विक्रेता संघाने वृत्तपत्र विक्री न करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे पुण्यात आज कोणतेही वृत्तपत्र घरी आले नाही, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र विक्रेता संघाचा निर्णय, पुण्यात अडीच हजार वृत्तपत्र विक्रेते असून त्यांच्याकडे 50 ते 60 हजार मुलं वृत्तपत्र वाटप करण्याचे काम करतात [/svt-event]
[svt-event date=”05/04/2020,9:42AM” class=”svt-cd-green” ] पुणे : जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आता कोरोनाबाबतचे प्रशिक्षण, कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागातही होत असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या उपाययोजना, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाचे तांत्रिक प्रशिक्षण, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनाचे 6 रुग्ण आढळले, जिल्ह्यातील एकूण 97 प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना प्रशिक्षण, [/svt-event]
[svt-event date=”05/04/2020,9:39AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमिवर शिक्षक आणि शिक्षकेतरांचे पगार लांबणीवर पडण्याची शक्यता, राज्य सरकारने दोन टप्प्यात वेतन देण्याचे आदेश दिल्यामुळे पूर्वीचा आदेश मागे लागणार आहे, त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतरांचे पगार लांबणीवर पडणार, सरकारने दिलेल्या आदेशानुसार टक्केवारीत पगार बिले काढावी लागणार आहेत, आधीचे दिलेली पगार बिले रद्द करुन शिक्षकांना नव्याने बिले द्यावी लागणार आहेत, ते जमा करण्यात 10 ते 15 दिवस लागण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event date=”05/04/2020,9:38AM” class=”svt-cd-green” ] बुलढाणा : जिल्ह्यात आणखी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8, आज सकाळी प्रतीक्षेत असलेल्या रिपोर्ट प्राप्त, 3 जणांना कोरोनाची लागण [/svt-event]
[svt-event date=”05/04/2020,9:36AM” class=”svt-cd-green” ] मिरा-भाईंदर : मिरा भाईंदर शहरात सोशल डिस्टनसिंग आणि लॉकडाऊनचं तीन तेरा, भाजी आणि मच्छी खरेदी करण्यासाठी नागरिकांचे गर्दी, वारंवार आहवान केल्यानंतरही काही लोक ऐकायला तयार नाही, भाजी खरेदी करण्याचा बहाने काही लोक वयोवृद्ध लोकांना मार्केट मध्ये घेऊन येत आहे, पोलीस त्यांना समझवण्याचा प्रयत्न करत आहे [/svt-event]