बीड : बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात नवे 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळले (Corona Patient increase Beed) आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 19 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण मुंबई, पुणे आणि ठाणे येथून आलेले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुंबई, पुणे येथील लोक जात असल्याने तेथे रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत (Corona Patient increase Beed) आहे.
हे रुग्ण केळगाव, गेवराई, चंदनसावरगाव आणि बीडमध्ये आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 19 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. तर 12 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. यातील 6 जणांवर पुणे येथे उपचार सुरु आहेत.
मुंबई-पुण्यातून आलेल्यांमुळे डोकेदुखी
दरम्यान मुंबई-पुण्यातून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्यांमुळे स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. कारण हे नागरिक गावी गेल्यानंतर तिथे त्यांची टेस्ट केली असता कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे तिथल्या स्थानिकांनाही त्याचा त्रास होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीडसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुंबई-पुण्यातून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही महाराष्ट्रातील नागिरकांना मुंबई, पुण्यातून गावी न जाण्याचे आवाहन केले.
“गावी जाण्याची नितांत गरज आहे का? जर तुम्हाला खरचं जायचं का, गरज आहे का? याचा विचार करा. तुम्ही गावी जाण्याऐवजी धीर धरला तर सर्वांसाठी बरं होईल, काही ग्रीन झोनमध्ये मुंबई-पुण्यातून गेलेले लोक पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही तुम्ही विचार करा, थोडा धीर धरा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत 37 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 हजार 325 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 9 हजार 639 रुग्ण कोरोनातून बरे झालेले आहेत.
संबंधित बातम्या :