Corona : पुणे 141, कोल्हापूर 7, औरंगाबाद 30, एकाच दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

| Updated on: May 16, 2020 | 10:59 AM

कोरोना विषाणूने जगभरासह देशात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये वाढ होत (Corona Patient increase) आहे.

Corona : पुणे 141, कोल्हापूर 7, औरंगाबाद 30, एकाच दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
Follow us on

पुणे : कोरोना विषाणूने जगभरासह देशात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये वाढ होत (Corona Patient increase) आहे. राज्यातही पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये दिवसाला कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. काल (15 मे) एकाच दिवशी पुण्यात 141, औरंगाबादमध्ये 30 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 7 कोरोना रुग्णांची नव्याने वाढ (Corona Patient increase) झाली आहे.

पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात 141 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवसात 141 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 3567 वर पोहोचला आहे. तर जिल्ह्यात दिवसभरात पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत एकूण 186 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याशिवाय जिल्ह्यात आतापर्यंत 1879 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

औरंगाबादमध्ये एकाचदिवशी 30 रुग्णांची वाढ

औरंगाबाद शहरात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 872 वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

औरंगाबाद शहरात आज (16 मे) आढळलेले रुग्ण हे एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1) अन्य (7) या भागातील आहेत. यामध्ये 17 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे.

घाटी रुग्णालयात मागील चोवीस तासात औरंगाबाद शहरातील नवीन हनुमान नगर येथील 74 वर्षीय, बायजीपुरा येथील 70 वर्षीय, शहानूर मियाँ येथील 57 वर्षीय आणि हिमायत नगर येथील 40 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत 25 कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाने दिली.

कोल्हापूर जिल्ह्यात एकाच दिवसात 7 रुग्णांची भर

कोल्हापूर जिल्ह्यातही एकाच दिवसात एकूण 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळेल आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 36 वर पोहोचली आहे. पुणे-मुंबईमधून येणाऱ्या लोकांमुळे कोल्हापूरातील धोका वाढल्याचे म्हटलं जात आहे. आतापर्यंत 9 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तर एकाचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 29 हजार 100 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 68 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 6 हजार 564 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजारांवर, मुंबईत 17,671 रुग्ण

धारावीत तब्बल 31000 जण होम क्वारंटाईन, आठ दिवसात 412 पॉझिटिव्ह, दिवसभरात चौघांचा मृत्यू