पुणे : पुणे जिल्ह्यात काल (6 जुलै) दिवसभरात 1245 कोरोनाबाधित रुग्ण आढळले (Corona Patient increase Pune) आहते. पुण्यात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 29 हजार 844 कोरोना रुग्ण आढळले (Corona Patient increase Pune) आहेत.
जिल्ह्यात दिवसभरात 21 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 890 बाधितांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यासोबतच जिल्ह्यात दिवसभरात 1066 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच आतापर्यंत 18 हजार 395 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.
पुणे महानगर पालिका क्षेत्रात काल दिवसभरात 861 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत तब्बल 22 हजार 381 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 15 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत तब्बल 730 रुग्णांना कोरोनाने मृत्यू झाला आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
पुणे शहरात काल दिवसभरात एकूण 630 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत शहरात 13 हजार 739 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 7912 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी 368 क्रिटिकल रुग्ण आणि 64 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
संबंधित बातम्या :
Leptospirosis | मुंबईत कोरोनानंतर आता लेप्टोचा धोका, नेमकी लक्षणं काय?