प्रवाशांनी वाढवली विदर्भाची चिंता, मुंबई-पुण्याहून आलेले 100 जण कोरोनाग्रस्त

| Updated on: May 27, 2020 | 9:50 AM

राज्यात मुंबई आणि पुणे शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरातील अनेकजण गावी जात (Corona Patient increase Vidarbha) आहेत.

प्रवाशांनी वाढवली विदर्भाची चिंता, मुंबई-पुण्याहून आलेले 100 जण कोरोनाग्रस्त
Follow us on

नागपूर : राज्यात मुंबई आणि पुणे शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरातील अनेकजण गावी जात (Corona Patient increase Vidarbha) आहेत. मुंबई-पुण्यातील लोकं गावी जात असल्याने गावाकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबई-पुण्यातून विदर्भात आलेल्यांमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत मुंबई-पुण्यावरुन विदर्भात आलेल्या 100 जणांना कोरोनाची लागण झाली (Corona Patient increase Vidarbha) आहे.

विदर्भातील भंडारा जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांपैकी 15 रुग्ण हे मुंबई, पुण्यावरुन आलेले प्रवाशी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात 23 रुग्ण आहेत. हे 23 रुग्ण मुंबई, पुण्यावरुन आलेले प्रवाशी आहेत. ग्रीन झोन असलेलल्या जिल्ह्यात मुंबई, पुण्यातील नागरिक आल्यामुळे तेथील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

नागपुरातही चार दिवसांत मुंबईवरुन आलेले चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर गोंदियातील बहुतांश रुग्णांना पुणे, मुंबई प्रवासाची पार्श्वभूमी आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांत प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या 100 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

मुंबई-पुण्यातून अनेकजण गावी जाण्यासाठी परवानगी मिळवत आहेत. पण या शहरातून जाणाऱ्या नागरिकांमुळे खेडे गावात कोरोना पोहोचत आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यात मुंबई-पुण्यावरुन आलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 54 हजार 758 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 1792 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 16 हजार 954 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 36 हजार 004 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

सातारा जिल्ह्याची धाकधूक वाढली, बारा तासात 58 नवे कोरोनाग्रस्त

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 54 हजार पार, दिवसभरात सर्वाधिक 97 बळी