पुणे : जिल्ह्यासह पुणे विभागातील रुग्णांची संख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढलं आहे (corona Patient recovery rate in Pune). पुणे विभागात बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येनं 8 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. विभागात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.95 टक्के आहे. विभागात 8 हजार 862 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. विभागात सध्या 14 हजार 77 बाधित रुग्ण आहेत. यापैकी 4 हजार 575 ॲक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यातील 286 रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत विभागात 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात कोरोनाचा सर्वाधिक जास्त प्रादुर्भाव पुणे जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यात 10 हजार 973 बाधित रुग्ण आहेत. यातील 6 हजार 912 रुग्ण बरे झाले. तर सध्या 3 हजार 596 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यातील 259 रुग्ण गंभीर आहेत. जिल्ह्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.99 टक्के आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 465 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 704 कोरोना बाधित रुग्ण आहेत. यातील 448 बाधित रुग्ण बरे झाले. सध्या 227 जण ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. साताऱ्यात आतापर्यंत 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 504 कोरोना बाधित रुग्ण आहेत. यापैकी 805 बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले. सध्या 567 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. सोलापूरमध्ये एकूण 132 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 192 कोरोना बाधित रुग्ण आहेत. यापैकी 103 बाधित रुग्ण बरे झाले. 83 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. सांगलीत आतापर्यंत 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात 704 कोरोना बाधित रुग्ण असून 594 बाधित रुग्ण बर झाले आहेत. येथे 102 ॲक्टीव्ह रुग्ण असून 8 रुग्णांचा मृत्यू झालाय.
दरम्यान, लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर (Total Corona Patients In Maharashtra) राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये आणखी वाढ होत चालली आहे. शुक्रवारी (12 जून) राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाखाच्या पार गेला आहे. आज दिवसभरात तब्बल 3 हजार 493 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 1 लाख 1 हजार 141 वर (Total Corona Patients In Maharashtra) पोहोचली आहे. आतापर्यंत 47 हजार 796 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 49 हजार 616 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील कोरोनाबळींची संख्या 3,717 वर
राज्यात आज दिवसभरात 127 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 3 हजार 717 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 1 हजार 718 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Update | दिवसभरात 3,493 नवे रुग्ण, कोरोनाबाधित रुग्ण संख्या 1 लाखांवर
School Reopen | शाळा उघडण्याचा मुहूर्त ठरला, नववी-बारावीचे वर्ग जुलैपासून
corona Patient recovery rate in Pune