पुणे : कोरोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांवर स्वत:च्या घरीच उपचार केले जाणार (Corona Patient treatment at home) आहेत. घरात उपचार करण्यासाठी स्वतंत्र खोली आणि स्वच्छतागृहाची सुविधा असणार्या रुग्णालाच घरी उपचार करण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असं पुणे महापालिकेने स्पष्ट केलं (Corona Patient treatment at home) आहे.
कोरोनाची सोम्य लक्षणं असणाऱ्यांवर घरीच उपचार केले जातील. पण त्यासोबत त्यांना होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक राहणार आहे. येत्या दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे संकेत महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिले आहेत.
सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार झाले तर यामुळे प्रशासनावरील 20 टक्के ताण कमी होणार आहे. आरोग्य विभागाने कोरोनाची सौम्य, अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरामध्येच योग्य प्रकारची सुविधा असल्यास ‘होम क्वारंटाईन’ करून टेली मेडिसीनव्दारे उपचार करावेत, असे सूचित केले होते. मात्र, महापालिकेने याची अंमलबजावणी आजवर केली नव्हती.
त्याशिवाय कोरोनाचे बहुतांशी रूग्ण हे झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीमध्ये राहणारे असल्याने घरच्या घरी उपचार आणि होम क्वारंटाईन शक्य नाही. त्यामुळे या परिसरातील रुग्णांना घरी उपचार करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
शहरातील अॅक्टीव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणि राहण्याची स्वतंत्र व्यवस्था असणार्या रुग्णांना ‘होम क्वारंटाईन’ चा शिक्का मारून घरी सोडण्यासंबंधीची कार्यवाही सुरू केली आहे.
सद्यःस्थितीला शहरात तीन हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 20 टक्के रुग्णांना घरी पाठवून त्यांच्यावर उपचार करणे शक्य आहे. तसेच, कोरोना चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आणि सौम्य लक्षणे असणार्या रुग्णांवर घरीच उपचार केल्यास 20 टक्के ताण कमी होऊ शकतो. मात्र, यासाठी रुग्णांच्या घरात विलग राहण्यासाठी स्वतंत्र खोली, स्वतंत्र टॉयलेट, बाथरूम असणे गरजेचे आहे.
संबंधित बातम्या :
Pune Corona Update | पुणे विभागात 10 हजार रुग्ण कोरोनामुक्त, मृत्यूदर 4.51 टक्क्यांवर
Pune Corona : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, एकाच दिवशी 550 रुग्ण