नवी दिल्ली : देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजाराच्या पार गेला आहे. गेल्या 24 तासात भारतात ‘कोरोना’चे 1 हजार 211 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण 10 हजार 363 रुग्णांची नोंद झाली आहे. (Corona Patients in India Update)
गेल्या 24 तासात देशात 31 जणांचा बळी गेला. आतापर्यंत भारतात 339 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली. सध्या देशात 8 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 1035 रुग्ण बरे झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना असल्याने अनेक राज्यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारही देशातील कोरोनासंदर्भातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेऊन आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत केंद्रीय गृहमंत्रालयाचे कार्यालय 24 तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
COVID19: 1211 new cases and 31 deaths reported in the last 24 hours: Ministry of Health and Family Welfare https://t.co/14s5nm2oW2
— ANI (@ANI) April 14, 2020