मुंबई : महाराष्ट्रात कालच्या दिवसात ‘कोरोना’च्या नव्या रुग्णांची संख्या घटली. बुधवारच्या दिवसात राज्यात 232 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक गोष्ट ही, की गेल्या सहा दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे. तर अमेरिकेत काल जवळपास 2600 रुग्णांचा मृत्यू झाला, हा कुठल्याही देशात एका दिवसात गेलेल्या बळींचा सर्वाधिक आकडा आहे. (Corona Patients Update Around the World)
राज्यात काल 232 नवे कोरोनाग्रस्त आढळल्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता 2 हजार 916 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात कालच्या दिवसात ‘कोरोना’चे 9 बळी गेले. राज्यातल्या ‘कोरोना’बळींची एकूण संख्या 187 वर गेली आहे.
मुंबईत अकरा दिवसातले निचांकी बळी
मुंबईत काल कोरोनाचे 2 रुग्ण दगावले. मुंबईत गेल्या 11 दिवसातले सर्वात कमी ‘कोरोना’बळी काल नोंदवले गेले. मुंबईत ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 114 वर पोहोचली आहे. मुंबईत आता ‘कोरोना’चे 1 हजार 896 रुग्ण आहेत.
पुण्यात मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूमध्ये वाढ पाहायला मिळाली. बुधवारी शहरात तब्बल 55 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. 24 तासात म्हणजे मंगळवारी सायंकाळी ते बुधवारी सायंकाळीपर्यंत पुण्यात एकूण पाच ‘कोरोना’बळी गेले. पुणे शहर आणि जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 43 झाला आहे. 24 तासात 56 नवीन रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात एकूण 437 रुग्ण झाले आहेत.
देशातील रुग्ण 12 हजारांच्या पार
देशभर काल कोरोनाचे 29 बळी गेले. भारतातील कोरोनाबळींचा एकूण आकडा 424 वर गेला आहे, तर देशभर आता 12 हजार 281 कोरोनाग्रस्त आहेत. कालच्या दिवसात कोरोनाचे 938 नवे रुग्ण देशभर सापडले. आतापर्यंत 1100 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
जगभर ‘कोरोना’चा कहर सुरुच
जगभरात मात्र कोरोनाचे थैमान वाढतच आहे. बुधवारी जवळपास 8 हजार कोरोनाबळींची नोंद झाली आहे. (Corona Patients Update Around the World) 12 देशांमध्ये कालच्या दिवसात प्रत्येकी 100 हून अधिक रुग्ण दगावले. काल दिवसभरात 7 हजार 956 कोरोनाग्रस्तांनी प्राण सोडले. जगात कोरोनाग्रस्तांची संख्या 20 लाखांच्या वर गेली आहे. जगभर आता 20 लाख 82 हजार 344 कोरोना रुग्ण आहेत. काल तब्बल 84 हजार 441 नव्या रुग्णांची भर पडली.
अमेरिका आणि फ्रान्समध्ये काल ‘कोरोना’चे तांडव पाहायला मिळाले. अमेरिकेत काल 2 हजार 479 रुग्णांचा मृत्यू झाला. हा कुठल्याही देशात एका दिवसात गेलेल्या बळींचा सर्वाधिक आकडा आहे. अमेरिकेत ‘कोरोना’चे एकूण बळी 28 हजार 526 वर गेले आहेत. अमेरिकेत कोरोनाचे एकूण 6 लाख 44 हजार रुग्ण झाले आहेत.
United States records nearly 2,600 #coronavirus deaths in 24 hours – a new record and the heaviest daily toll of any country, Johns Hopkins University reports: AFP news agency
— ANI (@ANI) April 16, 2020
युरोपीय देशांत कोरोनाच्या साथीचा फैलाव होतच आहे. फ्रान्समध्ये काल 1 हजार 438 रुग्णांचा बळी गेला. कालच्या दिवसात ब्रिटनमध्ये 761, इटलीत 578, तर स्पेनमध्ये 557 मृत्यू झाले. जर्मनीमध्ये 309, बेल्जियममध्ये 253, तर ब्राझीलमध्ये 225 कोरोनाग्रस्तांना जीव गमवावा लागला.
महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्तांची ताजी आकडेवारी इथे पाहा :
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
(Corona Patients Update Around the World)