Lockdown : ‘पोटभर जेवण द्या, अन्यथा आम्हाला जाऊ द्या’, बुलडाण्यातील क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची मागणी

| Updated on: Apr 02, 2020 | 10:42 PM

क्वारंटाईन केलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आल्याचं चित्र सध्या बुलडाण्यात पाहायला मिळत आहे.

Lockdown : पोटभर जेवण द्या, अन्यथा आम्हाला जाऊ द्या, बुलडाण्यातील क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची मागणी
Follow us on

बुलडाणा : क्वारंटाईन केलेल्या नागरिकांवर (Corona Quarantine Food Supply) उपासमारीची वेळ आल्याचं चित्र सध्या बुलडाण्यात पाहायला मिळत आहे. बुलडाण्यात गरीब, बेघर नागरिकांना तीन दिवसात फक्त 3 वेळा जेवण मिळत असल्याचं समोर आलं आहे. गुजरात येथून स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेल्यांना पोलिसांनी क्वारंनटाईन केले होते. या लोकांना खामगाव येथे ठेवण्यात आले (Corona Quarantine Food Supply) आहेत.

कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी सरकारने देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे सर्व उद्योग आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाहेर राज्यातील कामगार वर्गही मोठा प्रभावित झाला असून काम नसल्याने सर्व आपल्या राज्यात स्थलांतर करीत आहेत. मात्र, स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेले गुजरात, राजस्थान, झारखंड येथील 108 जणांना खामगाव पोलिसांनी डिटेन करुन त्यांना 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केलं.

हेही वाचा : ‘तब्लिग जमात’ कार्यक्रमातील 9 हजार लोक क्वारंटाईनमध्ये, 1306 विदेशी नागरिक : आरोग्य मंत्रालय

मात्र क्वारंटाईन करण्यात आलेल्या या नागरिकांवर आता उपासमारीची वेळ आल्याचं विदारक चित्र खामगाव येथे समोर आलं आहे. प्रशासनकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप हे मजूर करत आहेत.

‘कोविड-19’च्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाकडून (Corona Quarantine Food Supply) अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, संपूर्ण देश लॉकडाऊन असताना अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने मजूर आणि कामगार वर्ग स्थलांतरण करीत असल्याने प्रशासनासमोर या कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ज्या ठिकाणी मजूर स्थलांतरीत करतांना दिसतील, त्यांना तिथेच डिटेन करुन 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावरुन खामगावात मोहीम राबवून एकूण 108 परप्रांतीयांना खामगाव शहराबाहेरील पिंपळगाव राजा रोडवरील मागासवर्गीय वसतिगृहात क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे.

आपल्याला जीवनावश्य्क सुविधा दिल्या जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे परप्रांतीय तेथे राहायला तयार झाले. मात्र, प्रशासनाने दिलेल्या शब्दाला न जागता त्यांच्याकडे कानाडोळा केल्याने मागील 3 दिवसांपासून या 108 जणांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजता प्रशासनाने यांना खिचडी पाठविली होती. मात्र, ती कमी असल्याने अर्ध्यापेक्षा जास्त नागरिक उपाशी राहिले. तर, 3 दिवसांपासून त्यांना फक्त 3 वेळा जेवण देण्यात आलं आहे.

येथे शौचालयाची व्यवस्थाही नाही. याशिवाय मासिकपाळी आलेल्या महिलांकडेही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील महिला संतप्त झाल्या आहेत. सुविधा पुरवा आणि पोटभर जेवण द्या, अन्यथा आम्हाला जाऊ द्या, अशी विंनती येथील नागरिक करीत (Corona Quarantine Food Supply) आहे.