पुणे : सातत्याने वाढत्या कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्याला काहीसा दिलासा मिळाला आहे (Corona report of Pregnant women in Pune ). कोरोना संक्रमित रेडिओलॉजिस्टच्या संपर्कात आलेल्या शिक्रापूरच्या 62 गरोदर महिलांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या महिला कोरोना संक्रमित रेडिओलॉजिस्टच्या संपर्कात आल्याने त्यांना तात्काळ क्वारंटाईन करुन चाचणी घेण्यात आली.
कोरोना संक्रमित रेडिओलॉजिस्टच्या संपर्कात एकूण 69 महिला आल्या होत्या. त्यापैकी दोन महिला बाहेरील जिल्ह्यातील असल्याने स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. तर दोन महिलांची प्रसूती झालेली असून तीन महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल आहेत. मात्र या महिलांमध्ये कोणतीही लक्षणे न दिसल्याने त्यांचा अहवाल अद्याप पाठवण्यात आलेला नाही.
दरम्यान, सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्ट पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या गरोदर मातांनाही कोरोना संसर्गाचा धोका वाढला होता. संबंधित व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या 144 गरोदर महिलांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यापैकी 69 गरोदर महिलांनी संबंधित रेडिओलॉजिस्टकडून तपासणी केली होती, तर 75 महिलांनी केवळ रेडिओलॉजिस्ट सेंटरला भेट दिली होती. सेंटरला आलेल्या 75 महिलांचा थेट रेडिओलॉजिस्टशी संपर्क आला नव्हता. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या सर्व महिलांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं.
सोनोग्राफी सेंटरमध्ये 6, 7 आणि 8 एप्रिलला डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांची तपासणी केली होती. संबंधित व्यक्तीला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं डॉक्टरांनी 13 एप्रिलला स्वतःहून त्याची कोरोना टेस्ट केली. 14 एप्रिलला आलेल्या कोरोना चाचणी अहवालात संबंधित रेडिओलॉजिस्ट पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. त्याच्या संपर्कात शिक्रापूर परिसरातील 31 गावांमधील महिला आल्या होत्या. मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
संबंधित बातम्या :
सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्टला ‘कोरोना’, पुण्यात 144 गर्भवती क्वारंटाईन
Corona : पुणे विभागात 518 कोरोनाबाधित, आतापर्यंत 47 जणांचा बळी
बारामतीतील रिक्षाचालक ‘कोरोना’मुक्त, हिंगोलीतील पहिल्या रुग्णाचे रिपोर्टही निगेटिव्ह
भवानी पेठेतील ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर, पुण्याची प्रभागनिहाय आकडेवारी
पुण्यात मुस्लिम मंचाने सर्वधर्मीय कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली
Corona report of Pregnant women in Pune