Corona Virus | भारतात सलग तीन आठवडे कोरोना रुग्णसंख्या वाढ स्थिरावली, मृत्यूदरही घटला

| Updated on: Nov 30, 2020 | 11:07 AM

देशात गेल्या तीन आठवड्यात तीन लाखांपेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळत आहेत. ( Corona Virus cases in India)

Corona Virus | भारतात सलग तीन आठवडे कोरोना रुग्णसंख्या वाढ स्थिरावली, मृत्यूदरही घटला
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us on

नवी दिल्ली : भारतातील कोरोना रुग्णसंख्येने 94 लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. देशातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 88 लाख 47 हजार 600 आहे. तर सध्या 4 लाख 46 हजार 952 रुग्णांवर देशभरात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत भारतात 1 लाख 37 हजार 139 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यातील पहिला आठवडा वगळता इतर तीन आठवड्यांमध्ये नव्याने समोर आलेल्या रुग्णांची संख्या 3 लाखांपेक्षा कमी राहिली आहे. ( Corona Virus cases in India)

सलग तीन आठवडे रुग्णसंख्या तीन लाखांपेक्षा कमी

भारतामधील कोरोना रुग्णांच्या वाढती रुग्ण संख्या स्थिरावल्याचे दिसून आले. 22- 29 नोव्हेंबर दरम्यान 2 लाख 91 हजार 903 कोरोना रुग्ण आढळले होते. यापूर्वीच्या आठवड्यात 15-22 नोव्हेंबरमध्ये 2 लाख 92 हजार 475 तर 8 ते 15 नोव्हेंबरमध्ये 2 लाख 92 हजार 549 कोरोना रुग्ण आढळले होते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1 ते 7 तारखेदरम्यान 3 लाख 24 हजार 476 कोरोना रुग्ण आढळले होते.( Corona Virus cases in India)

जगाच्या तुलनेत मृत्यूदर कमी

भारतातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.45 टक्के इतका आहे. जागतिक आकडेवारीचा अभ्यास केला असता सध्या भारतातील दहा लाख लोकसंख्येमध्ये 99 लोकांचा मृत्यू होत आहे. देशात कोरोना मृत्यूंची संख्या दरदिवशी 500 च्या खाली आलेली आहे.देशात 22 ते 29 नोव्हेंबर दरम्यान 3388 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 15 ते 21 नोव्हेंबरच्या कालावधीत 3641 तर 8 ते 15 तारखेच्या दरम्यान 3476 जणांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबरमहिन्याअगोदर भारतात प्रत्येक आठवड्याला भारतात 4 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.( Corona Virus cases in India)

रविवारी ( 29 नोव्हेंबर) देशात 39 हजार 192 कोरोना रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी (27 नोव्हेंबर) 41 हजार 927 कोरोना रुग्ण आढळले होते.

अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या घटली

भारतातील अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 4 लाख 50 हजारांच्या खाली आलेली आहे. रविवारी सर्वाधिक कोरोना रुग्ण केरळ राज्यात आढळले. केरळमध्ये 5643 तर महाराष्ट्रात 5544 आणि दिल्लीमध्ये 4906 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

पंतप्रधानांकडून कोरोना लसीचा आढावा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारतातील कोरोना लसीवर संशोधन करणाऱ्या हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे येथील संस्थांना भेट दिली. नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (28 नोव्हेंबर) कोरोना लसीची निर्मिती सुरू असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. आदर पुनावाला आणि सिरममधील संशोधकांकडून त्यांनी लसीबाबतची माहिती घेतली. त्यानंतर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली होती. कोरोना लसीची तिसरी चाचणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडून परवानगी घेण्यात येणार आहे. येत्या दोन आठवड्यात लायसन्सची मागणी करण्यात येणार असल्याचं आदर पुनावाला यांनी सांगितलं होतं.( Corona Virus cases in India)

संबंधित बातम्या: 

मिशन कोरोना व्हॅक्सीन! अहमदाबाद, हैदराबादनंतर पंतप्रधान मोदी सिरममध्ये; संशोधकांशी साधला संवाद

सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीसंदर्भात केंद्राकडे परवान्यासाठी तातडीनं अर्ज करणार; आदर पुनावालांची माहिती

( Corona Virus cases in India)