नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा हाहा:कार पाहायला (Corona Virus Confirm Cases) मिळत आहे. देशात विविध राज्यात शनिवारी (21 मार्च) कोरोनाची लागण झालेले 50 नवे रुग्ण आढळले. यामुळे शनिवारी सकाळी देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 285 वर पोहोचला आहे. तर या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 6 हजार 700 लोकांना क्वारंटाईन केलं आहे.
देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा हा शुक्रवारी (20 मार्च) 250 इतका (Corona Virus Confirm Cases) होता. मात्र शनिवारी या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने ही संख्या 285 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली. यात 32 विदेशी रुग्णांचा समावेश असून 17 इटालियन, 3 फिलिपीन्स, 2 ब्रिटेन तर प्रत्येकी एक कॅनडा, इंडोनेशिया आणि सिंगापूरचे रहिवाशी आहेत. तर आतापर्यंत दिल्ली, कर्नाटक, पंजाब आणि महाराष्ट्र या चार राज्यात एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.
दरम्यान देशभरातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 63 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात पुण्यात 22 तर मुंबईत 21 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
काल दिवसभरात 11 रुग्ण वाढले. यामध्ये 10 रुग्ण मुंबईचे तर 1 पुण्याचा नवा रुग्ण आढळला आहे. यापैकी तिघांना संपर्क आल्यामुळे तर परदेशातून आलेल्या 8 जणांना लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्य | कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (भारतीय) | कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (विदेशी) | डिस्चार्ज | मृत्यू |
---|---|---|---|---|
दिल्ली | 16 | 1 | 2 | 1 |
हरियाणा | 4 | 14 | ||
केरळ | 33 | 7 | 3 | |
राजस्थान | 21 | 2 | 3 | |
तेलंगाणा | 10 | 9 | 1 | |
उत्तर प्रदेश | 22 | 1 | 9 | |
लडाख | 10 | |||
तमिळनाडू | 3 | 1 | ||
जम्मू-काश्मीर | 4 | |||
पंजाब | 6 | 1 | ||
कर्नाटक | 15 | 1 | 1 | |
महाराष्ट्र | 59 | 3 | 1 | |
आंध्रप्रदेश | 3 | |||
उत्तराखंड | 3 | |||
ओडिशा | 2 | |||
पश्चिम बंगाल | 2 | |||
छत्तीसगड | 1 | |||
गुजरात | 9 | |||
पाँडेचरी | 1 | |||
चंदीगड | 5 | |||
मध्यप्रदेश | 4 | |||
हिमाचल प्रदेश | 2 | |||
236 | 38 | 23 | 4 |
संबंधित बातम्या
Corona Virus | मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प, राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन
Corona Virus | पुण्यातील सर्व पेट्रोल पंप दुपारनंतर बंद, पेट्रोल डीलर्सचा बंदला अर्धवेळ पाठिंबा