CoronaVirus: कोरोना संसर्ग झालेल्या अधिकाऱ्याची भेट, डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी

| Updated on: Mar 15, 2020 | 8:30 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना संसर्ग झालेल्या ब्राझीलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे (Donald Trump Corona Test).

CoronaVirus: कोरोना संसर्ग झालेल्या अधिकाऱ्याची भेट, डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना संसर्ग झालेल्या ब्राझीलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे (Donald Trump Corona Test). ट्रम्प यांच्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ही आला आहे. त्यामुळे ट्रम्प यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

ट्रम्प यांनी नुकतीच ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो (Jair Bolsonaro) आणि त्यांच्यासोबतचे अधिकारी फॅबियो वाजगार्टन यांची फ्लोरिडामध्ये भेट घेतली होती. यानंतर वाजगार्टन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून ट्रम्प यांची चाचणी घेण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः आपल्या कोरोना चाचणीची माहिती एका पत्रकार परिषदेत दिली होती. ट्रम्प म्हणाले होते, “माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाही. मात्र, तरीही माझी कोरोना संसर्गाची (COVID 19) होऊ शकते.”


हेही वाचा : महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

दरम्यान, अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. अमेरिकेत आतापर्यंत जवळपास 1 हजार 678 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तसेच 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 649 पर्यंत गेली आहे. तसेच मृतांचा आकडा 5 हजार 393 पर्यंत पोहचला आहे.

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • एकूण – 31 कोरोनाबाधित रुग्ण

संबंधित बातम्या : 

Corona | मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, निवडणुकाही पुढे ढकलण्याची मागणी

Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना

महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

Corona | मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 4 लाखांची मदत

CORONA : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण

Donald Trump Corona Test