Corona : धक्कादायक! पुण्याचा कोरोना मृत्यूदर देशाच्या दुप्पट

| Updated on: Apr 11, 2020 | 9:04 AM

100 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यातील मृतांचा आकडा पाहिला तर देशात सर्वाधिक मृत्यूदर पुणे जिल्ह्याचा असल्याचे दिसते.

Corona : धक्कादायक! पुण्याचा कोरोना मृत्यूदर देशाच्या दुप्पट
Follow us on

पुणे : पुण्यात कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे (Corona Virus Death Rate). पुण्याचा कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिक असल्याचं दिसून येत आहे. कोरोना बाधित रुग्ण आणि मृत्यू झालेल्यांमध्ये महाराष्ट्र (Corona Virus Death Rate) आघाडीवर आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांबरोबर मृतांची संख्या ही राज्याच्या तुलनेत अधिक वाढत आहे. 100 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यातील मृतांचा आकडा पाहिला तर देशात सर्वाधिक मृत्यूदर पुणे जिल्ह्याचा असल्याचे दिसते.

पुण्यात शुक्रवारपर्यंत 209 बाधित रुग्णांपैकी 25 जणांचा मृत्यू झाला, हा आकडा महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यांपेक्षा अधिक आहे. मुंबईत मृतांची संख्या सर्वाधिक असली तरी रुग्णांची संख्या अधिक असल्याने मृत्यूदर हा सहा टक्क्याच्या जवळपास आहे (Corona Virus Death Rate).

पुण्याचा मृत्यूदर हा 11. 96% असून त्या तुलनेने जगाचा मृत्यूदर 5.97 टक्के आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढण्याबरोबरच मृतांचा आकडा वेगानं वाढत आहे. राज्यात सर्वाधिक 54 मृत्यू मुंबई तर 25 मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले आहेत.

पुण्यात शुक्रवारी कोरोनामुळे आतापर्यंत 25 मृत्यूंची नोंद झाली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1574 वर

राज्यात आज (10 एप्रिल) कोरोनाच्या 210 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1574 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra). यातील काहिसा दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत एकूण 188 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1176 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Corona Virus Death Rate

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

नॉट रिचेबल बड्या नेत्याला फडणवीसांनी तात्काळ शोधलं होतं, अजित पवारांचा उल्लेख टाळत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

Corona : देशातील कोरोना रुग्णांची संख्या 6761 वर, तर 206 जणांचा मृत्यू

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1574 वर, एकाच दिवशी 210 नव्या रुग्णांची नोंद

देशात 1 कोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्यांची गरज, आपल्याकडे उपलब्ध… : केंद्रीय आरोग्य मंत्रालय