मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसचा हाहा:कार (Corona Virus India) पाहायला मिळत आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 433 झाली आहे. तर आतापर्यंत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 50 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत (Corona Virus India) आहे. आज (23 मार्च) भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 415 इतकी झाली आहे. यात देशभरातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 89 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक 39, पुणे 16, पिंपरी चिंचवड 12 रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली.
हेही वाचा : Corona समूह संसर्ग : कोरोना प्रसाराचा तिसरा टप्पा नेमका काय?
महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये 67 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीत 30 आणि उत्तरप्रदेशात 25 कोरोनाग्रस्त रुग्ण पाहायला मिळत आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, जम्मू काश्मीर, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेशात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. यासोबत उत्तरप्रदेशातील 16 जिल्हे 25 मार्चपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात येणार (Corona Virus India) आहे.
राज्य | कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (भारतीय) | कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (विदेशी) | डिस्चार्ज | मृत्यू |
---|---|---|---|---|
दिल्ली | 16 | 1 | 2 | 1 |
हरियाणा | 4 | 14 | ||
केरळ | 33 | 7 | 3 | |
राजस्थान | 21 | 2 | 3 | |
तेलंगाणा | 10 | 9 | 1 | |
उत्तर प्रदेश | 22 | 1 | 9 | |
लडाख | 10 | |||
तमिळनाडू | 3 | 1 | ||
जम्मू-काश्मीर | 4 | |||
पंजाब | 6 | 1 | ||
कर्नाटक | 15 | 1 | 1 | |
महाराष्ट्र | 59 | 3 | 1 | |
आंध्रप्रदेश | 3 | |||
उत्तराखंड | 3 | |||
ओडिशा | 2 | |||
पश्चिम बंगाल | 2 | |||
छत्तीसगड | 1 | |||
गुजरात | 9 | |||
पाँडेचरी | 1 | |||
चंदीगड | 5 | |||
मध्यप्रदेश | 4 | |||
हिमाचल प्रदेश | 2 | |||
236 | 38 | 23 | 4 |
संबंधित बातम्या :
मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा 3 वर
Corona Virus | जमावबंदी झुगारुन मुलुंड टोलनाक्यावर वाहनांची गर्दी, खासगी वाहनांच्या रांगा
दहा दिवस पुरेसाच रक्तसाठा, अंतर राखून रक्तदान करा, राजेश टोपेंची कळकळीची विनंती