नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने मोठी (Corona virus International flights Cancelled) पावलं उचलली आहेत. “येत्या 22 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे एक आठवड्यासाठी रद्द केली आहेत. तर 10 वर्षावरील मुलं आणि 65 वर्षांवरील वृद्धांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.भारतात कोरोनाचा शिरकाव परदेशातूनच झाला आहे, त्यामुळे मोदी सरकारने उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला.
Government of India: No scheduled international commercial passenger flights shall be allowed to land in India from March 22 for one week. #coronavirus pic.twitter.com/cr7txySAhJ
— ANI (@ANI) March 19, 2020
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द केली (Corona virus International flights Cancelled) आहेत. येत्या 22 मार्चपासून एका आठवड्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द करण्यात येणार आहेत. या काळात भारतात एकही विमान लँड होणार नाही.
Government of India: State governments are being requested to enforce work for home for private sector employees except those working in emergency/essential services.
— ANI (@ANI) March 19, 2020
त्याशिवाय आपत्कालीन किंवा अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणार्या व्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांनी Work From Home करावे अशी विनंतीही केंद्र सरकारने केली आहे.
Govt of India: All children below 10 should be advised to stay at home and not to venture out. Railways and civil aviation shall suspend all concessional travel except for students, patients and divyang category. https://t.co/rf7XbLVvZ8
— ANI (@ANI) March 19, 2020
तर 10 वर्षावरील मुलं आणि 65 वर्षांवरील वृद्धांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच विद्यार्थी, रूग्ण आणि दिव्यांग प्रवर्ग वगळता रेल्वे आणि नागरी विमान वाहतूक सर्व सवलतीच्या प्रवासाला स्थगिती देण्यात आली आहे.
Corona Death India | देशात ‘कोरोना’चा चौथा बळी, पंजाबमध्ये एकाचा मृत्यू
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर, विस्तारा एअरलाईन्सने 23 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द केली आहेत.
Vistara to temporarily suspend international operations from 23rd March to 15th April. #COVID19 pic.twitter.com/JIsv2wmGnL
— ANI (@ANI) March 19, 2020
दरम्यान देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 4 वर पोहोचला (Corona Death India) आहे. आज (19 मार्च) पंजाबमध्ये एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाबाधितांची (Corona Death India) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली आहे. तर चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला (Corona virus International flights Cancelled) आहे.
देशात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
Corona virus International flights Cancelled