मुंबई : राज्यात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं (Corona Virus Update) आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 26 वरुन 31 वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात भीतीचे वातावरण पसरलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकारकडून सर्व शाळा, कॉलेज, मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकतंच पिंपरी-चिंचवड या ठिकाणी 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 15 वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 31 झाली आहे.
Public Health Department, Maharashtra: 5 more people found positive in Pimpri-Chinchwad today taking total tally of positive cases in Pune to 15. Maharashtra state tally reaches 31. #Coronavirus
— ANI (@ANI) March 14, 2020
मुंबईत चौघांना कोरोनाची लागण
राज्यात 13 मार्च ते 14 मार्च दरम्यान तब्बल 9 रुग्ण आढळले होते. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली होती. मात्र नुकतंच राज्यात आणखी 5 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. नुकतंच मुंबईत 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. तर अहमदनगर 1, यवतमाळ 2 आणि मुंबईत 1 असे चार रुग्ण भरती आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात (Corona Virus Update) कोरोनाबाधित 9 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 26 झाली आहे. यात 4 जण पुण्यातील असून हे पहिल्या 2 कोरोनाबाधित रुग्णांसोबत दुबई सहलीला गेलेल्या चमूपैकी आहेत. तर यापैकी अहमदनगर 1, यवतमाळ 2 आणि मुंबईत 1 रुग्ण भरती आहे. या चौघांशिवाय मुंबईत आणखी 4 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यात हिंदूजा रुग्णालयात भरती असलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या रुग्णांची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
मुंबईत आढळलेले इतर दोन रुग्ण हे 37 आणि 59 वर्षांचे पुरुष आहेत. त्यांचा अनुक्रमे अमेरिका, फ्रान्स आणि फिलिपाईन्स प्रवासाचा इतिहास आहे. नागपूर येथे भरती झालेला आणि कतार देशात प्रवासाचा इतिहास असलेला एक 43 वर्षीय पुरुष ही कोरोना बाधित असल्याचा सांगितले आहे. आज कोरोना बाधितांपैकी एक महिला आहे.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
संबंधित बातम्या :
Corona | मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, निवडणुकाही पुढे ढकलण्याची मागणी
Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना
महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
Corona | मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 4 लाखांची मदत
CORONA : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण