मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या (Corona Patients Increased) संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं आहे. आज (16 मार्च) नवी मुंबईत आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची संख्या 39 वर गेली आहे.
आज सकाळी राज्यात कोरोनाचे 5 नवे रुग्ण (Corona Patients Increased) आढळले. यात तीन जण हे मुंबईतील आहे. एक नवी मुंबईतील आहे. तर एक यवतमाळमधील आहे. कोरोनाबाधितांची प्रकृती स्थिर आहे. यातील 18 ते 19 व्यक्ती परदेशातून आलेले आहे. तर इतर लोक हे त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना झाला आहे,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात ‘स्टेज 2’चा कोरोना, होम कोरेनटाईन व्यक्तीच्या हातावर निळ्या रंगाचा शिक्का : राजेश टोपे
यवतमाळमध्ये 51 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झालीआहे. ही महिला पुण्यात करोना बाधित आढळलेल्या आणि दुबई सहलीला गेलेल्या चमूतील आय टी तज्ञाची आई आहे. ती स्वतः ही दुबई सहलीमध्ये सहभागी झाली होती.
महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 39 झाली आहे. #CoronaVirusUpdates pic.twitter.com/lnsyWBrlgA
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 16, 2020
विशेष बाब म्हणजे या दुबईला गेलेल्या 40 जणांच्या चमूतील एकून 15 जण कोरोना बाधित आहेत. तर 22 जण निगेटिव्ह आहेत. या चमूतील बेळगाव येथील 3 जणांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरात विलग करण्यात आले आहे.
पुण्यात पूर्ण संचारबंदी नाही, पण बंधनं लागू, आवश्यक गोष्टी आणून ठेवा : म्हैसेकर
आज करोना बाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे.आजपर्यंत फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या या 10 जणांच्या चमूतील 3 जण करोना बाधित आढळले असून इतर 7 जण करोना निगेटिव्ह आढळले आहेत.
“चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांसह युएस, सौदी अरेबिया, दुबई या देशांचाही या यादीत समावेश केला आहे. या देशातून येणाऱ्यांना A,B, C या यादीत विभागणी केली जात आहे. तसेच यात जे व्यक्ती होम कोरेनटाईन केलं जात आहे त्यांच्या हातावर निळ्या रंगाचा शिक्का असेल. त्यामुळे जर तो व्यक्ती घराबाहेर पडला तर त्याला ओळखता येणे शक्य होईल,” असेही आरोग्यमंत्र्यांनी (Corona Patients Increased) सांगितले.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?