वाशिम : जगभरात जीवघेण्या कोरोना विषाणूने (Corona Virus Terror) हाहा:कार माजवला आहे. भारतासह महाराष्ट्रातही सर्वत्र कोरोनाची धास्ती दिसून येत आहे. याचा परिणाम आता सार्वजनिक समारंभासह लग्नविधी सारख्या कौटुंबिक कार्यक्रमांवरही होऊ लागला आहे.
वाशिम जिल्ह्यातील वर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वधू यांचा आज (8 मार्च) साखरपुडा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे होता. मात्र, लग्नावेळी कोरोनामुळे लग्नास बंदी आल्यास लग्न पुढे ढकलून घ्यावे लागेल. या भीतीपोटी साखरपुड्यात लग्न उरकण्यात आलं. पुसद येथील जेष्ठ नागरिक भवनात हा लग्न समारंभ पार पडला.
वाशिम जिल्ह्यातील किनखेडा येथील (Corona Virus Terror) शुभम रामकिसनराव देशमुख आणि यवतमाळ जिल्ह्यातील तिवरंग इथल्या दिपाली कैलासराव कदम याचं लग्न येत्या 14 मे रोजी ठरलं होतं. त्यानुसार, आज यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे त्यांचा साखरपुडा होता. मात्र, दोन्ही परिवारांना देशात कोरोना विषाणूमुळे दहशत असल्याचं माहित होतं. त्यामुळे त्यांनी पुसद येथील जेष्ठ नागरिक भवनात साखरपुड्यातच लग्न उरकून टाकण्याचा निर्णय घेतला.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे हा साखरपुडा होता. मात्र, कोरोनाच्या दहशतीमुळे लग्नात अडथळे येऊ नये, म्हणून आम्ही दोन्ही परिवारने या साखरपुड्यात आज सायंकाळी 7 वाजता लग्न उरकून घेतले असल्याचे (Corona Virus Terror) नवरदेवांच्या वडिलांनी सांगितलं.
दरम्यान, कोरोना विषाणूने आता चीनबाहेरही आपली दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. हळूहळू हा विषाणू जगातील अनेक देशांंमध्ये शिरकाव करु लागला आहे. भारतातही कोरोनाने शिरकाव केला आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे 39 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, कोरोनापासून वाचण्यासाठीच्या योजनाही आखल्या जात आहेत.
संबंधित बातम्या :
कोरोनाचा चिकन बाजाराला फटका, 60 टक्के मांसाहारप्रेमींची चिकनकडे पाठ
कोरोना इफेक्ट : हात मिळवण्यास आलेल्या व्यक्तीसमोर शरद पवारांनी हात जोडले
कोरोनाचा फटका, IPL पुढे ढकलण्याचा विचार : आरोग्य मंत्री राजेश टोपे
Corona Virus | भारतात कोरोनाचा शिरकाव, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 10 सोपे उपाय