मुंबई : देशात कोरोनाचं थैमान सुरुच आहे(Corona Virus Update In India). गेल्या 24 तासात देशभरात 1,543 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सध्या 29,435 वर पोहोचला आहे. ही संख्या चिंताजनक आहे. यापैकी 6,865 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर देशात सध्या 21,631 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात 30 जानेवारीला भारतात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता(Corona Virus Update).
30 जानेवारीपासून ते आजपर्यंत देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही 29,435 वर पोहोचली आहे. तर देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे 6 हजार 169 रुग्ण आहेत. मात्र, भारतात एक रुग्ण ते 29,435 कोरोना रुग्ण हा आकडा इतका कसा वाढला. देशात सर्व खबरदारी घेऊनही लॉकडाऊन घोषित करुनही कोरोनाचा कहर भारतात वाढतच गेला, तो कसा आणि किती पटीने वाढला त्याचा हा आढावा.
देशात कोरोनाचा कहर, 24 तासात 1543 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 29,435 वरhttps://t.co/duR0am4B8m
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 28, 2020
भारतात कसा वाढला कोरोनाचा कहर?
किती दिवसांमध्ये किती कोरोनाबाधित रुग्ण | कालावधी | बाधितांची संख्या |
---|---|---|
45 दिवसात 100 | 30 जानेवारी ते 14 मार्च | 102 |
16 दिवसात 1000 | 15 मार्च ते 29 मार्च | 1,139 |
11 दिवसात 5000 | 30 मार्च ते 9 एप्रिल | 6,728 |
11 दिवसात 10,000 | 8 एप्रिल से 19 एप्रिल | 17,305 |
9 दिवसात 13,119 | 20 एप्रिल से 28 एप्रिल | 30,424 |
सर्वाधिक कोरोनाबाधित ठरलेले पाच दिवस कोणते?
दिवस | कोरोना बाधित |
---|---|
23 एप्रिल | 1667 |
25 एप्रिल | 1835 |
26 एप्रिल | 1607 |
27 एप्रिल | 1561 |
28 एप्रिल | 1903 |
Corona Virus Update In India
सर्वाधिक जीवघेणे ठरलेले 5 दिवस कोणते?
23 एप्रिल | 44 |
24 एप्रिल | 57 |
25 एप्रिल | 37 |
26 एप्रिल | 60 |
27 एप्रिल | 54 |
28 एप्रिल | 71 |
एक महिन्यानंतर भारतात 22 हजार कोरोनाबाधित रुग्ण वाढले. चीनमध्ये एक महिन्यानंतर 75 हजाराने, तर इटलीत सव्वा लाखाने कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती.
देश | लॉकडाऊनचा पहिला दिवस बाधित/मृत्यू | लॉकडाऊनचा 30वा दिवस बाधित/मृत्यू |
---|---|---|
भारत | 657 / 12 | 23,039 / 721 |
चीन | 830 / 25 | 76,288 / 2,345 |
इटली | 9,172 / 463 | 1,35000 / 17,127 |
देशात 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण नाही
देशभरातील 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. तर देशातील 16 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. याशिवाय कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण आता 22.17 टक्क्यांवर आलं आहे, अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
Corona Virus Update In India
संबंधित बातम्या :
आयटी कंपन्यांना 31 जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सूट, केंद्राची मोठी घोषणा
घराच्या ओढीने तरुणाचा 1700 किमी सायकलने प्रवास, सांगलीहून सात दिवसात ओदिशा गाठलं
पैशांचा तुटवडा, किडनी आणि लिव्हरचे उपचार परवडेना, राहुल गांधी 1,000 रुग्णांची जबाबदारी घेणार