मुंबई : कोरोना विषाणूला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत समाजमाध्यमांवर एक परिपत्रक प्रसारित झाले (central government Holiday Notification fake) होते. मात्र हे परिपत्रक खोटे असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून (central government Holiday Notification fake) सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे एक परिपत्रक व्हायरल होत होते. या परिपत्रकात दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरविण्यात येत आहे. मात्र त्यात कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहे. अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत.
Fact check on FAKE O. M. of the Health Ministry.
Please read the details here:https://t.co/e9BFk3M70b@PMOIndia @drharshvardhan @AshwiniKChoubey @PIB_India @MIB_India @DDNewslive @airnewsalerts @PTI_News @ANI
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) March 13, 2020
यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेतली असून, याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्यशासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अहमदनगरमधील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे.
कोरोना व्हायरस संदर्भात शासनातर्फे अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहे. यानुसार, “पुढील आदेशापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरातील जिम, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनात याबाबतची माहिती दिली.
यात दहावी आणि बारावी परीक्षेच्या व्यतिरिक्त पिंपरी-चिंचवड आणि पुणे या ठिकाणच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शाळा मात्र नियमित सुरु राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी (central government Holiday Notification fake) सांगितले.
संबंधित बातम्या
पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील बाधितांची संख्या 14 वर
Corona cases in India | देशात आतापर्यंत 73 जणांना लागण, कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर
Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर
घरी ये राजा, तुला आयुष्यभर खाऊ घालेन, ‘कोरोना’च्या भीतीने पुण्यातील लेकाला माऊलीची आर्त हाक