न्यूयॉर्क : जगभरात ‘कोरोना’वर लस शोधण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असताना अमेरिकेतून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोविड19 विषाणूवरील लसीच्या विकासात आशेचा किरण दिसल्याचा दावा ‘मॉडर्ना’ बायोटेक्नॉलॉजीकल कंपनीने सोमवारी केला. लसीच्या चाचणीचे प्राथमिक निकाल आशादायक असल्याचा कंपनीचा दावा आहे. (Coronavirus vaccine from US based Moderna shows early signs of Corona virus immune response)
मॉडर्नाने तयार केलेल्या लसीचा डोस आतापर्यंत आठ जणांना देण्यात आला आहे. त्यानंतर या रुग्णांच्या प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद वाढल्याचे दिसले. त्यामुळे जगात ‘कोरोना’वरील पहिली लस सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मॉडर्ना कंपनीच्या दाव्यानुसार पहिल्यांदाच ‘कोरोना’ विषाणूची लस सुरक्षित असल्याचे दिसते. आठ निरोगी व्यक्तींना लसी देण्यात आल्या असून त्यांचे निकाल आशादायक आहेत. प्रत्येक स्वयंसेवकाला लसीचे दोन डोस दिले गेले. मार्च महिन्यात ही चाचणी सुरु झाली होती, अशी माहिती मॉडर्ना कंपनीने दिली.
मॉडर्ना ही आरएनए आधारित लसीची मानवी चाचणी करणारी पहिली औषध कंपनी आहे. कंपनीचा तिसरा टप्पा यशस्वी झाला तर कंपनी लस बनवण्यासाठी अर्ज करु शकते.
चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात 600 जणांचा समावेश असेल, असे मॉडर्नाने सांगितले. तर जुलै महिन्यात तिसऱ्या टप्प्यात हजारो जणांना समाविष्ट केले जाईल. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मॉडर्नाला चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्याची मान्यता दिली आहे.
Moderna released Phase I clinical trial data for a coronavirus vaccine in 8 patients. While everyone is looking for the light at the end of the tunnel, we need a dose of realism here. Phase I is to assess safety of the vaccine and tells us nothing about whether it is effective.
— Eugene Gu, MD (@eugenegu) May 18, 2020
नुकतेच इस्रायलचच्या संरक्षण मंत्र्यांनीही कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला होता. “IIBR या संस्थेने तयार केलेली प्रतिजैविके मोनोक्लोनल पद्धतीने कोरोना व्हायरसवर हल्ला करतात. ही लस रुग्णाच्या शरीरातील सर्व कोरोना विषाणूंचा सर्वनाश करते. त्यामुळे विषाणू शरीराच्या इतर भागात पसरत नाही”, असा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री बेन्नेट यांनी केला होता.
“आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर या लसीच्या उत्पादनाबाबत जगभरातील विविध कंपन्यांसोबत चर्चा करणार आहोत. मला इस्त्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चच्या संपूर्ण टीमचा अभिमान वाटतो”, असं नाफताली बेन्नेट म्हणाले होते.
दरम्यान, या लसीचं क्लिनिक ट्रायल किंवा ह्यूमन ट्रायल झालं आहे का? याबाबत बेन्नेटे यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
संबंधित बातम्या :
कोरोना विषाणूवर लस तयार, इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
कोरोनावर लस शोधल्याचा Oxford विद्यापीठाचा दावा, सप्टेंबर महिन्यात लस येण्याची शक्यता
कोणत्याही लसीशिवाय कोरोना विषाणू नष्ट होईल, डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा
कोरोनावरील लस संशोधनात कराडच्या कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग
(Coronavirus vaccine from US based Moderna shows early signs of Corona virus immune response)