जयपूर : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता. यामुळे पाकिस्तनवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतातील जनतेकडून करण्यात येत होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बेधडक असे उत्तर दिलं. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय वायुसेनेने PoK मध्ये एअर स्ट्राईक केली. हा हल्ला दहशतवादी संघटनांच्या लाँचवर करण्यात आला.
सौगंध मुझे इस मिट्टी की।
मैं देश नहीं मिटने दूंगा।।मैं देश नहीं रुकने दूंगा।
मैं देश नहीं झुकने दूंगा।।मेरा वचन है भारत मां को।
तेरा शीश झुकने नहीं दूंगा।।सौगंध मुझे इस मिट्टी की।
मैं देश नहीं मिटने दूंगा।। pic.twitter.com/2ED1jJP5B0— BJP (@BJP4India) February 26, 2019
एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देशाची ओळख आज वेगळी आहे. मला तुम्हाला विश्वास द्यायचाय की देश हा सुरक्षित हातात आहे. मला या मातीची शपथ आहे, देशाला कुणापुढेही झुकू देणार नाही. देशापेक्षा काहीही मोठं नाही, असं म्हणत मोदींनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कविता सादर केली.
लाइव : पीएम श्री नरेन्द्र मोदी की चूरू, राजस्थान में विशाल विजय संकल्प सभा। https://t.co/bVHW4xT3hj
— BJP (@BJP4India) February 26, 2019
एअर स्ट्राईकनंतरच्या पहिल्याच जाहीर सभेत मोदी बोलत होते. राजस्थानमधील चुरुमध्ये मोदींची सभा होती. यानंतर त्यांनी एअर स्ट्राईकवर पहिली प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले, राष्ट्रीय युद्ध स्मारक देशाला अर्पण केलंय. माजी सैनिकांना वन रँक वन पेंशन देण्याचं आश्वासन दिलं होतं. आतापर्यंत 35 हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, असं मोदी म्हणाले.
VIDEO :