Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात तब्बल 3,254 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, आकडा 94 हजारांच्या पार

| Updated on: Jun 10, 2020 | 9:27 PM

लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्ण वाढीचा हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 94 हजार 41 वर पोहोचली आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात तब्बल 3,254 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, आकडा 94 हजारांच्या पार
Follow us on

मुंबई : राज्यात आज (10 जून) तब्बल 3 हजार 254 नवीन (COVID-19 Patient Update) कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्ण वाढीचा हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 94 हजार 41 वर पोहोचली आहे. यापैकी 44 हजार 517 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 46 हजार 74 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (COVID-19 Patient Update) यांनी दिली.

राज्यातील कोरोनाबळींची संख्या 3,438 वर

राज्यात आज दिवसभरात 149 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 3 हजार 438 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 1 हजार 879 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

5,69,145 जण होम क्वारंटाईनमध्ये

राज्यातील कोरोनाबाधितांच्या बरे होण्याचा दर आता 47.34 टक्क्यांवर आला आहे. तर राज्याचा मृत्यूदर सध्या 3.65 टक्के इतका आहे. राज्यात 5 लाख 69 हजार 145 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, सध्या 27 हजार 228 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

COVID-19 Patient Update

आज कुठे किती मृत्यू?

  • मुंबई – 97
  • ठाणे – 15
  • नवी मुंबई – 5
  • उल्हासनगर – 3
  • वसई-विरार – 2
  • जळगाव – 5
  • पुणे – 10
  • औरंगाबाद – 7
  • बीड – 1
  • अकोला – 2
  • अमरावती – 1
  • गडचिरोली – 1

मुंबईत कोरोनाचे 1,567 नवे रुग्ण

मुंबईत आज कोरोनाचे 1,567 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात 97 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 हजार 667 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 1,857 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 23 हजार 94694 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

COVID-19 Patient Update

संबंधित बातम्या :

कोरोनाबाधित 82 वर्षीय आजीचा मृतदेह 8 दिवस बाथरुममध्ये, जळगाव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Monsoon Session | विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन महिनाभर लांबणीवर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे