मुंबई : कृषी विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणपत्रिका किंवा सर्टिफिकेटवर कोव्हिड 19 असा उल्लेख नसेल, अशी ग्वाही कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. कोरोना काळात परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना सरासरी गुणांच्या आधारे निकाल दिला जात आहे. मात्र या गुणपत्रिकांवर कोव्हिड 19 असा उल्लेख नको, या मागणीचा आग्रह भाजपकडून केला जात आहे. माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार हा मुद्दा लावून धरला आहे. (Dada Bhuse on covid19 Marksheet)
त्याबाबत स्पष्टीकरण देताना कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले, “कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोव्हिड 19 असा उल्लेख नसेल. आधीच्या सत्रातील परीक्षांचे गुण आणि शेवटच्या वर्षाचे 50 टक्के गुण या सूत्रानुसार निकाल जाहीर करण्यात येईल. मात्र त्यावर कोव्हिडबाबत कोणताही उल्लेख नसेल. हे निकाल जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर होतील. विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही”
आशिष शेलार यांचं ट्वीट
दरम्यान, भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत ट्वीट करुन सरकारवर निशाणा साधला. “कृषी विद्यापीठातील गुणपत्रिकेवर “प्रमोटेड कोविड-19” असा शिक्का असल्याचे आता समोर आलेय. ही बाब अत्यंत चुकीची, विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. आम्ही सूचना केल्या की सरकारच्या अंगाला सुया टोचतात..विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून आम्ही हेच सांगत होतो एवढे दिवस! “ढ” कारभार सगळा!” असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं.
कृषी विद्यापीठातील गुणपत्रिकेवर “प्रमोटेड कोविड-19” असा शिक्का असल्याचे आता समोर आलेय. ही बाब अत्यंत चुकीची, विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे.
आम्ही सूचना केल्या की सरकारच्या अंगाला सुया टोचतात..विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून आम्ही हेच सांगत होतो एवढे दिवस! “ढ” कारभार सगळा! pic.twitter.com/aDtaQUhErT— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 14, 2020
परीक्षा रद्द
राज्यातील कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना आता गेल्या वर्षभरातील अंतर्गत गुणांचे मूल्यमापन आणि गेल्या दोन वर्षातील गुणांची सरासरीनुसार उत्तीर्ण केलं जाणार आहे. राज्यातील 230 कृषी विद्यालयातील दहा हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दोन आणि तीन वर्ष कालावधीच्या पदविकाच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात अपेक्षित होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
(Dada Bhuse on covid19 Marksheet)
संबंधित बातम्या
वाईन शॉपची तुलना विद्यापीठांशी कशाला? परीक्षा घेऊ शकत नाही, ठाकरे सरकारची रोखठोक भूमिका