नागपूर : राज्यात कोरोनाबाधितांचा विळखा वाढत (Covid Special Hospital Nagpur) आहे. नागपुरात कोरोना रुग्णांचा आकडा 152 वर पोहोचला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागपुरात मध्य भारतात पहिलं सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात आलं आहे. जवळपास 200 खाटांचं हे कोविड रुग्णालय आहे. मध्य भारतातल्या पहिलं कोविड हॉस्पिटलचा कोरोना रुग्णांना मोठा आधार मिळत आहे.
नागपूरच्या मेडिकलमधील ट्रॉमा सेंटरमध्ये हे कोविड रुग्णालय उभारण्यात आलं (Covid Special Hospital Nagpur) आहे. जवळपास 200 खाटांच्या या कोवीड रुग्णालयात 60 खाटा या आयसीयूसाठी ठेवण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे स्वतंत्र क्ष-किरण विभाग, प्रयोगशाळा, रक्तसाठा केंद्र अशा सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेलं हे मध्य भारतातील हे पहिलं कोविड रुग्णालय आहे.
या रुग्णालयात सध्या 54 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर याच रुग्णालयातून 26 कोरोना रुग्ण बरे झाले आहे. यामुळे मध्य भारतातील हे पहिलं रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी मोठा आधार बनत आहे.
दरम्यान नागपुरात कालचे सर्व 193 रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. नागपूर शहरात आतापर्यंत 151 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. काल चार रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 50 वर पोहोचली आहे. ‘कोरोना’वर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 33 टक्के झालं आहे.
नागपुरात कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसुती झाली. सतरंजीपुरा परिसरातील 29 वर्षीय महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. मेडिकल भागामधील कोवीड हॉस्पिटलमध्ये महिलेची प्रसुती झाली. महिलेचा दुसरा आणि तिसरा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. 48 तासांनंतर नवजात बाळाचे नमुने तपासणार आहेत.
संबंधित बातम्या :
नागपूरवासियांना दिलासा, रविवारी एकही नवा कोरोनाग्रस्त नाही, 193 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
पुण्यात कोरोनाबाधित पोलिसांसाठी तीन रुग्णालय, 50 बेड्स राखीव