मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन (Crime During Lockdown ) आहे. मात्र, या काळातही गुन्ह्यांमध्ये कमी आलेली नाही. शिवाय, अनेकांनी लॉकडाऊनचे नियमही तोडले. लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च ते 2 मे कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 91,217 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, 18,048 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 25 लाख रुपयांचा दंड (Crime During Lockdown ) आकारण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबरवर 82,894 फोन आले. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का आहे, अशा 630 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले आहे.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1255 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर 51,719 वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्याशिवाय, परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे (Crime During Lockdown ) 15 गुन्हे राज्याभरात दाखल झाले आहेत.
राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, 361 पोलिसांना कोरोनाची लागणhttps://t.co/8slVu7qp2e #MaharashtraFightsCorona #MaharashtraPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2020
पोलिसांवरील हल्ले
लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर हल्ला होण्याचं प्रमाणंही मोठं आहे. यादरम्यान, पोलिसांवरील 173 हल्ल्यांची नोंद झाली आहे. या प्रकरणांतील 659 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्यातील 361 पोलिसांना कोरोना
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना 51 पोलीस अधिकारी आणि 310 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यापैकी 23 पोलीस अधिकारी आणि 26 कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून इतर 28 पोलीस अधिकारी आणि 281 पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर, तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू (Crime During Lockdown ) झाला आहे.
संबंधित बातम्या :
Lockdown : सहा दिवस पायपीट करुन परतलेल्या मजुरांना जंगलात क्वारंटाईन, वाशिममधील ग्रामपंचायतचा प्रताप
महाराष्ट्रात दारुची दुकानं उघडणार, पण नियम काय?
अमरावतीकरांनी स्वतःला 14 दिवस सेल्फ क्वारंटाईन करावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, 361 पोलिसांना कोरोनाची लागण