पुणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जगभरात कोटेकोर नियमांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रातही मुंबई-पुण्यासह राज्यभरात अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. पुण्यात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी 2 तासांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु आहेत. मात्र अशाही परिस्थितीत नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं भान राहिलेलं नाही, असंच चित्र आहे. पुण्यात चिकन-मटण खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं (Crowd in Pune to buy Chicken amid lockdown). जिभेचे चोचले पुरवण्यासाठी स्वतःच्या जीवासोबत अनेकांचे जीव धोक्यात घातले जात आहेत.
पुण्यातील गुरुवार पेठेत मटणाच्या दुकानासमोरची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तोंडाला मास्क न लावताच नागरिक सार्वजनिक ठिकाणी जमा झाले. या ठिकाणी शटरखाली ओढून दुकानातून मटण विक्री केली जात होती. थोडसं शटर उघडतात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळं येथील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. जवळच भवानी पेठेचा परिसर आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती स्थानिकांना अधिक वाटत आहे. त्यामुळे आता प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग अनेक पद्धतीने होतो. त्यामुळे नागरिकांनी अंतर ठेऊन जीवनावश्यक वस्तूंची खरदी करण्याचं वारंवार आवाहन केलं जात आहे. मात्र, पुणेकरांकडून याला हरताळ फासला जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवत सर्रास गर्दी केली जात आहे. यावर उपाय म्हणून अशा बेजबाबदार पुणेकरांवर कारवाईची मागणी होत आहे.
संबंधित बातम्या :
पुणे जिल्ह्यात 516 उद्योगांना परवानगी,19 कंपन्यांमध्ये उत्पादनही सुरु
Crowd in Pune to buy Chicken amid lockdown