कच्च्या तेलाच्या किमती गडगडल्या, 18 वर्षांतील निच्चांक, पेट्रोल 30 रुपये लिटर द्या, काँग्रेसची मागणी

| Updated on: Mar 19, 2020 | 1:59 PM

2002 मध्ये कच्च्या तेलाने निच्चांक गाठला होता, तेव्हा पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर 30 रुपयांच्या घरात पोहोचले होते. Crude oil price decreases

कच्च्या तेलाच्या किमती गडगडल्या, 18 वर्षांतील निच्चांक, पेट्रोल 30 रुपये लिटर द्या, काँग्रेसची मागणी
Follow us on

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती बुधवारी पुन्हा गडगडल्या. तेलाच्या किमतीत 26 टक्क्यांनी घट झाल्याने 18 वर्षांतील निच्चांक गाठला. कोरोना व्हायरसमुळे मंदावलेली मागणी, तसेच सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात वाढलेल्या जागतिक दरयुद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या. त्यामुळे पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाचे दर 30 रुपये प्रतिलिटर करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. (Crude oil price decreases)

कोरोना व्हायरस जगभर थैमान घालत असल्यामुळे गेल्या महिन्यात तेलाची मागणी केवळ 51 टक्क्यावर आली. रद्द झालेल्या सहलीच्या पार्श्वभूमीवर एअरलाइन्स आणि क्रूझ जहाजांमध्ये होणाऱ्या इंधनाच्या मागणीला जोरदार फटका बसला आहे. त्यातच उत्पादन कपातीवर सहमती न झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत चढाओढ सुरु आहे.

वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटने (डब्ल्यूटीआय) बुधवारी प्रति बॅरल 23.41 डॉलर दराने तेलाची विक्री केली. 2002-03 मध्ये इतक्या कमी दराने कच्च्या तेलाची विक्री झाली होती. त्यावेळी पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर 30 रुपयांच्या घरात पोहोचले होते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाचे दर कमी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कॉंग्रेसचे सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता यांचं ट्वीट :

जुलै 2018 मध्ये 147 डॉलर प्रति बॅरल इतक्या उच्चांकी दराने तेलाची विक्री झाली होती.

मार्च आणि एप्रिल महिन्यात कच्च्या तेलाची मागणी प्रतिदिन एक कोटी Barrel ने घटण्याची चिन्ह आहेत. एक Barrel म्हणजे 159 लिटर. म्हणजे दर दिवशी 159 कोटी लिटर कच्च्या तेलाचा वापर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 47 वर पोहोचला आहे. पुणे, मुंबई, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, कल्याण या ठिकाणी कोरोनाचे रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 11, पुण्यात 8, तर मुंबईत 9 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. (Crude oil price decreases)