नाशिक : नाशिक शहरात कोरोना रुग्ण्यांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आजपासून संध्याकाळी 7 ते पहाटे 5 पर्यंत पुन्हा कर्फ्यू ठेवण्यात आला (Corona Patient increase Nashik) आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कर्फ्यू ठेवण्याचा निर्णय घेण्यात (Corona Patient increase Nashik) आला आहे.
शहरात संध्याकाळी 7 ते पहाटे 5 पर्यत कर्फ्यू असणार आहे. पण या दरम्यान जर कुणी बाहेर पडले तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार आहे, असं सांगण्यात आलं आहे. त्यासोबत प्रशासनाच्या या निर्णयाचं नाशिककरांकडून स्वागत करण्यात आले आहे.
नाशिक शहरातील कर्फ्यू दरम्यान बाजारपेठाही संध्याकाळी पाच पर्यंतच खुल्या राहणार आहेत. त्यासोबत मुख्या मार्गावर, दही पूल, सराफ बाजार परिसरात नो व्हेहिकल झोन करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरु आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. यामुळे आता शहरवासियांची चिंता वाढू लागली आहे. दिवसागणिक नाशिक शहरात, ग्रामीण भागात कोरोना रुग्ण समोर येत असल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे. त्यात नाशिक शहर आता कोरोना हॉटस्पॉट झाल्याने जिल्हा आरोग्य विभागही चिंतेच्या गर्तेत अडकला आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत 1 लाख 74 हजार 761 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण 90 हजार 911 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 7 हजार 855 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Update | राज्यात 4,787 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 74 हजार 761 वर
Lockdown Extension | ठाणे, कल्याण-डोंबिवलीत 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?