मुंबई : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. भारतातील सर्वच राज्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहेत. त्यातच आता भारताला चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला (Amphan Cyclone) आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतात ‘अम्फान’ नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या खाडीजवळ आणि अंदमान बेटाजवळील समुद्राजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अंदमान निकोबार, ओदिशा, पश्चिम बंगाल यासह इतर राज्यात 17 ते 20 मे रोजी चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Amphan Cyclone)
या चक्रीवादळादरम्यान ताशी 55 ते 65 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच हा वेग वाढत जाऊन 75 किमी इतका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ओदिशा किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी केला आहे.
‘या’ राज्यांना चक्रीवादळाचा फटका
ओदिशासोबत पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझारोम, मणिपूर या ठिकाणीही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अफ्मान वादळामुळे या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या वादाळाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय डोंगराळ भाग असलेल्या जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान या ठिकाणीही वातावरणात बदल जाणवू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
It’s very likely to intensify rapidly into a Cyclonic Storm during next 12 hrs & into a severe cyclonic storm during subsequent 24 hrs. Very likely to move north-NW wards initially till 17 May & re-curve north-NW wards across NW Bay of Bengal towards WB coast during 18-20 May:IMD https://t.co/QDhBBMhWyv
— ANI (@ANI) May 16, 2020
हवामान विभागाने मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई केली आहे. त्याशिवाय अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार पाऊस कोसळणार असल्याचे बोललं जात आहे.
केरळमध्ये चक्रीवादळाचा थेट तडाखा बसणार नसला तरी रविवारी (17 मे) मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहावे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तामिळनाडू, कर्नाटक राज्यामध्येही अम्फानमुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
(Amphan Cyclone)
संबंधित बातम्या :
Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबण्याची चिन्हं, केरळात 5 जूनला धडकण्याचा अंदाज
Rain | राज्यात अनेक ठिकाणी वळीव बरसला, पुणे, नगर, नांदेड, जालन्यात जोरदार पाऊस