मुंबई : निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने (Cyclone Nisarga live update) वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहेत. पालघर, डहाणू, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
मुंबईपासून 600 किलोमीटरपर्यंत याचा प्रभाव होईल (Hurricane prediction by IMD in Kokan region). याचा मोठा फटका पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, हरिहरेश्वर या ठिकाणी बसण्याचा अंदाज आहे. कोकणात जोरदार पाऊसही होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
संपूर्ण राज्यात 4 जूनपर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीवर हे वादळ घोंघावण्याची चिन्हं आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. (Cyclone Nisarga live update)
Cyclone Nisarga live update
[svt-event title=”Nisarga Cyclone | निसर्ग परीक्षा घेतोय, ताकदीने सामना करु : मुख्यमंत्री” date=”02/06/2020,8:52PM” class=”svt-cd-green” ]
Nisarga Cyclone | निसर्ग परीक्षा घेतोय, ताकदीने सामना करु : मुख्यमंत्रीhttps://t.co/ZG6297IQiQ#UddhavThackeray #NisargaCyclone #Maharashtra@OfficeofUT @CMOMaharashtra @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2020
[svt-event title=”रायगड समुद्र किनारी दुपारी 12 च्या सुमारास वादळ धडकण्याची शक्यता” date=”02/06/2020,7:49PM” class=”svt-cd-green” ]
जाहिर सूचना.
दि. ०३/०६/२०२० रोजी अंदाजे दुपारी १२.०० वा. “निसर्ग” चक्री वादळ रायगडचे समुद्र किनारी धडकणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते कि सकाळी ०९.०० ते सायं ०६.०० वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये.— Navi Mumbai Police (@Navimumpolice) June 2, 2020
[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार” date=”02/06/2020,6:50PM” class=”svt-cd-green” ]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वा. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार @CMOMaharashtra pic.twitter.com/0Cm7N2iu0E
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2020
[svt-event title=”चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जुहू परिसरात प्रशासनाकडून हवाई पाहणी” date=”02/06/2020,6:23PM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”जालना शहरासह परिसरात रिमझिम पाऊस” date=”02/06/2020,6:18PM” class=”svt-cd-green” ] जालना – अंबड, जालना आणि बदनापूर शहरासह परिसरात रिमझिम पाऊस सुरु, शेतकऱ्यांना पेरणीसाठी फायदेशीर ठरणारा पाऊस, तर भोकरदन , जाफराबाद , घनसावंगी , मंठा , परतूर तालुक्यात केवळ ढगाळ वातावरण [/svt-event]
[svt-event title=”वादळाची वाटचाल कशी? पुण्याच्या IMD मधून लाईव्ह” date=”02/06/2020,5:39PM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”निसर्ग वादळ 3 जूनला दुपारी अलिबाग पार करण्याची शक्यता” date=”02/06/2020,5:32PM” class=”svt-cd-green” ] अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे आज दुपारपर्यंत चक्रीवादळात आणि नंतर रात्री तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता, भारतीय हवामान खात्याचा इशारा, निसर्ग हे चक्रीवादळ ताशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने येणार, 3 जूनला दुपारी अलिबाग पार करण्याची शक्यता आहे [/svt-event]
[svt-event title=”रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावरील 62 गावांना वादळाचा धोका” date=”02/06/2020,5:29PM” class=”svt-cd-green” ] अलिबाग : निसर्ग चक्रीवादळ 3 जून रोजी कोकण समुद्र किनारपट्टीवर धडकणार आहे. उद्या सकाळी 5.30 वाजता वादळाचा जोर जास्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 100 ते 125 ताशी वाऱ्याचा वेग असण्याची शक्यता आहे. वादळी पाऊस पडणार आहे. या चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन मोठी हानी होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, उरण समुद्रकिनाऱ्यावरील 62 गावांना वादळाची झळ बसणार आहे. [/svt-event]
[svt-event title=”निसर्ग वादळ मुंबईपासून 430 किमी अंतरावर” date=”02/06/2020,5:00PM” class=”svt-cd-green” ] पुणे : निसर्ग चक्रीवादळ गोव्यापासून 280 किलोमीटर दूर आहे, मुंबईपासून 430 किलोमीटर लांब आहे. वादळ किनारपट्टीवर पोहोचण्यास 11.30 तास लागतील. पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. 120 किलोमीटर प्रति तासाने हे वादळ धडकेल. कोकण, मध्य महाराष्ट्र, धुळे,नंदुरबार नाशिकमध्ये, पुणे घाट माथ्यावर जोरदार पाऊस होईल. मुंबई, पालघर, रायगडमध्ये मोठा इम्पॅक्ट येईल, या परिसरात 27 सेमी पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवमान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=”निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता” date=”02/06/2020,4:36PM” class=”svt-cd-green” ]
Breaking : निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उद्या (3 जून) काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, स्कायमेट या खासगी वेधशाळेचा दावा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई आणि उपनगरात हाय अलर्ट जारी, NDRF चे 10 पथक तैनात https://t.co/geObg96uI5 pic.twitter.com/ydvQK1x9O5
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2020
[svt-event title=”चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे उपाय” date=”02/06/2020,3:57PM” class=”svt-cd-green” ]
चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे उपाय #NisargaCyclone pic.twitter.com/DGvpLk594i
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकणार” date=”02/06/2020,4:39PM” class=”svt-cd-green” ] निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकणार, यापूर्वी हरिहरेशवर येथे धडकण्याचा अंदाज होता, रायगड जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, एनडीआरएफची आणखी 2 पथके अलिबागेत दाखल होणार, श्रीवर्धन आणि अलिबाग येथे प्रत्येकी एक पथक तैनात, पावणेदोन लाख लोकसंख्येला या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता
[svt-event title=”निसर्ग चक्रीवादळाचा विदर्भावरही परिणाम” date=”02/06/2020,1:40PM” class=”svt-cd-green” ] निसर्ग चक्रीवादळाचा विदर्भावरही परिणाम, विदर्भाच्या काही भागात उद्या मुसळाधार पावसाचा अंदाज, चार आणि पाच जूनलाही विदर्भात पावसाचा अंदाज, नागपूर हवामान विभागानं वर्तवला पावसाचा अंदाज, कालपासून विदर्भात ढगाळ हवामान [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरीत चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या 18 जणांची टीम दाखल” date=”02/06/2020,1:35PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या 18 जणांची टीम दाखल, एनडीआरएफची टीम चिपळूणहून गुहागरला रवाना, वादळानंतर पडणारी वृक्ष तोडण्यासाठी लागणारी सर्व मशिनरी आणि साधन सामग्रीसह एनडीआरएफची टीम सज्ज [/svt-event]
[svt-event title=”चक्रीवादळाचा कोकण आणि दक्षिण गुजरात भागात प्रभाव जास्त” date=”02/06/2020,1:29PM” class=”svt-cd-green” ] चक्रीवादळ हे 3 जूनला संध्याकाळी आणि 4 जूनला पहाटेपर्यंत राहणार, कोकण आणि दक्षिण गुजरात भागात त्याचा प्रभाव जास्त राहणार, मान्सून केरळात दाखल, त्या मान्सूनबरोबर समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं निसर्ग वादळ निर्माण, कुलाबा वेधशाळा हवामान विभागाचे संचालक के. एस. होसळीकर यांची माहिती. [/svt-event]
[svt-event title=”Mumbai Cyclone | मुंबईच्या जुहू किनारपट्टीवर कोस्टगार्डचे पथक तैनात ” date=”02/06/2020,4:13PM” class=”svt-cd-green” ] Mumbai Cyclone |
[svt-event title=”‘निसर्ग’ वादळाची दिशा, कसं घोंघावतंय वादळ?” date=”02/06/2020,1:24PM” class=”svt-cd-green” ]
#मुंबई : Nisarga Cyclone Alert | ‘निसर्ग’ वादळाची दिशा, कसं घोंघावतंय वादळ? pic.twitter.com/xCrZnxwTp4
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2020
[svt-event title=” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये एनडीआरएफ पथक तैनात ” date=”02/06/2020,1:05PM” class=”svt-cd-green” ] चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात, पालघर आणि डहाणूमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात, पालघर जिल्ह्याधिकारी डॉ. कैलास शिंदेंकडून सतर्कतेचा इशार म्हणून मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन [/svt-event]
[svt-event title=”निसर्ग वादळाबाबत तटरक्षक दलामार्फत समुद्रात सूचना ” date=”02/06/2020,12:56PM” class=”svt-cd-green” ] निसर्ग वादळाबाबत तटरक्षक दलामार्फत समुद्रात सूचना, विमानं आणि जहाजामार्फत दिली जातेय सूचना, महाराष्ट्र, गोवा, गुजरातच्या सीमेवर मच्छीमारांना सूचना [/svt-event]
[svt-event title=”मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये : विजय वडेट्टीवार” date=”02/06/2020,12:51PM” class=”svt-cd-green” ] हवामान खात्यानं वादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे रायगड, सिंधुदुर्ग, मुंबईत सतर्कतेचा इशारा दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. मदत आणि पुनर्सवसन खात्यामार्फत योग्य ती काळजी घेतली जात आहे. उत्तर महाराष्ट्रात याचा जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे, असं मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. [/svt-event]
[svt-event title=”‘निसर्ग’ वादळाची दिशा, वेग ग्राफिक्सच्या माध्यमातून” date=”02/06/2020,4:11PM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वसईच्या समुद्र किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा” date=”02/06/2020,12:43PM” class=”svt-cd-green” ] चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वसईच्या समुद्र किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा, 3 आणि 4 जून रोजी समुद्र किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकणार, हवामान खात्याचा अंदाज, अर्नाळा किल्ला, अर्नाळा गाव परिसरात आजपासूनच समुद्राच्या किनाऱ्यावर मोठ्या लाटा, सकाळपासून ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी [/svt-event]
निसर्ग चक्रीवादळाबाबत तटरक्षक दलामार्फत मच्छिमारांना समुद्रात सूचना, विमानं आणि बोटींमार्फत सूचना देऊन बोटी किनाऱ्याला लावण्याचं आवाहन, महाराष्ट्र, गोवा, गुजरातच्या सीमेवर मच्छीमारांना सूचना @Ksbsunil pic.twitter.com/xJO80KaY8r
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2020
निर्सग वादाळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या टीम सज्ज आहेत. एनडीआरएफची टीम सिंधुदुर्ग, पालघर, रायगडमध्ये दाखल झाली आहे. या पथकाने रायगडमध्ये श्रीवर्धनला समुद्राची पाहणी केली. तिकडे सिंधुदुर्ग तारकली समुद्र किनारी पाहणी करुन इकडे डहाणू दातीवडे येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.
Maharashtra: National Disaster Response Force (NDRF) teams deployed in Palghar conduct survey in the district and take stock of the situation, in view of impending severe cyclone. pic.twitter.com/Uba1CDerAc
— ANI (@ANI) June 2, 2020
हरिहरेश्वरमध्ये वादळापूर्वीची शांतता
अरबी समुद्रातील चक्रीवादळ हे रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरला धडकणार आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या भीतीनं स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या हरिहरेश्वरला वादळापूर्वीची शांतता दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर गावातील 80 टक्के नागरिकांना पक्क्या घरात स्थलांतरित करण्यात येणार आहे. मात्र प्रशासनाकडून मदत आणि सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तहसीलदार आणि बीडीओंनी फोनवर संपर्क साधून माहिती घेतली. मात्र आपत्ती व्यवस्थापनाचं कोणतीही उपाययोजना राबवली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
पालघरमध्ये यंत्रणा सज्ज
चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता सध्या पालघर मध्ये NDRFला पाचारण करण्यात आलं आहे . NDRF च्या दोन टीम काल संध्याकाळी उशिरा पालघरमध्ये दाखल झाल्या असून, एक टीम पालघर तर दुसरी टीम डहाणू तालुक्यात तैनात करण्यात आली आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केलं आहे. तर येणाऱ्या आपत्तीशी लढण्यास पुरेपूर साधन सामग्री असून नागरिकांनी घाबरून न जाण्याच आवाहन ndrf कडून करण्यात आलं आहे.
(Cyclone Nisarga live update)
संबंधित बातम्या :
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका, NDRF ची टीम तैनात, ठाणे-पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज