दंगल गर्लची बॉलिवूडमधून धक्कादायक एक्झिट

| Updated on: Jun 30, 2019 | 12:13 PM

दंगल गर्ल अभिनेत्री झायरा वसीमने खूप कमी वयात आणि कमी वेळेत आपल्या शानदार अभिनयाच्या जोरावर तिने आपली ओळख निर्माण केली होती. आता ती सोनाली बोसचा सिनेमा द स्काय इज पिंकमध्ये दिसणार आहे.

दंगल गर्लची बॉलिवूडमधून धक्कादायक एक्झिट
Follow us on

मुंबई : दंगल गर्ल अभिनेत्री झायरा वसीमने खूप कमी वयात आणि कमी वेळेत शानदार अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली होती. आता ती सोनाली बोसचा सिनेमा ‘द स्काय इज पिंक’मध्ये दिसणार आहे. पण सध्या तिच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. झायराने एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. ज्यामध्ये ती अभिनय क्षेत्र सोडत असल्याची घोषणा केली आहे.

“बॉलिवूडमध्ये मला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. मी पाच वर्षापूर्वी घेतलेल्या माझ्या निर्णयामुळे माझे पूर्ण आयुष्य बदलले. मला यामध्ये प्रसिद्धी आणि लोकांचे प्रेम मिळाले. पण मला हे नको होते. मी येथे फिट होत आहे पण मी इथली नाही”, असं झायरा आपल्या पोस्टमध्ये म्हणाली.

झायराने सोशल मीडियावर 6 पानांची चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये तिने कुरानाचाही उल्लेख केला आहे. हा मार्ग मला अल्लाहपासून लांब करत आहे, असंही झायराने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

झायराच्या या पोस्टवरुन सध्या सोशल मीडियावरुन चाहत्यांमध्ये अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. झायराचे अकाउंट हॅक झाले असावे, झायराने दबावात येऊन हे सर्व लिहिलं असावे, असा अंदाज चाहत्यांकडून लावला जात आहे.

द स्काय इज पिंक सिनेमाची शूटिंग संपली आहे. या चित्रपटात झायरा वसीन शिवाय अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर दिसणार आहेत .