मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा, चितेला मुखाग्नी देत पारंपारिक प्रथेला फाटा

| Updated on: Oct 16, 2020 | 3:46 PM

जेष्ठ पत्रकार सोमनाथ सावळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद नुकतेच निधन झाले. सावळे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी डोंगरशेवली येथे पारंपारिक प्रथांना फाटा देत त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देत आणि चितेला मुखाग्नी दिला. (Buldana)

मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा, चितेला मुखाग्नी देत पारंपारिक प्रथेला फाटा
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

बुलडाणा : पत्रकारितेतील मानाचा दर्पण पुरस्कार प्राप्त असलेले बुलडाणा येथील जेष्ठ पत्रकार सोमनाथ सावळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद नुकतेच निधन झाले. सावळे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी डोंगरशेवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. पारंपारिक प्रथांना फाटा देत सावळे यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देत आणि चितेला मुखाग्नी दिला. यामुळे मुलगा-मुलगी यांना समानतेचे स्थान असल्याचा संदेश देण्यात आला. (Daughters did funeral of father in Buldana)

बुलडाणा येथील जेष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक सोमनाथ सावळे यांचे वयाच्या 55 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखत निधन झाले. सावळेंनी 30 वर्षाच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मुला – मुलींमध्ये काही भेदभाव नाही ही समानतेची शिकवण त्यांनी दोन्ही मुलींना दिली होती. त्यामुळे त्यांच्या मृणाली आणि श्रुती या दोन्ही मुलींनी वडिलांच्या प्रेताला खांदा देत मुखाग्नी दिला.

सोमनाथ सावळे यांना पत्रकारिता क्षेत्रातील दर्पण पुरस्कारा सोबतच पत्र तपस्वी हा पुरस्कार राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करत सन्मान करण्यात आला होता.बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारितेत सोमनाथ सावळे यांनी अनेक वर्ष कामं केले. त्यांच्या निधनानं जिल्ह्याच्या पत्रकारितेची मोठी हानी झाल्याची भावना समधान सावळे यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या: 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी चुकीची, सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले

मोफत गिरण, मोफत आरओचं पाणी, मोफत विजेची तयारी, घरांवर महिलांची नावं, झक्कास मेहेरगावची यशोगाथा!

(Daughters did funeral of father in Buldana)