भंडारा : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात झालेल्या स्फोटात भंडारा जिल्ह्यातील दिघोरी मोठे या गावचे दयानंद शहारे शहीद झाले. आज त्यांचा वाढदिवस होता. पण बर्थडेच्या एक दिवस आधीच त्यांना वीरमरण आलं. परिवार आणि मित्रांनी वाढदिवस साजरा करण्याची तयारी केली होती. पण काल संध्याकाळी दयानंद शहीद झाल्याची बातमी आली आणि त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. दयानंद यांचं पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना साडेतीन आणि दीड वर्षांची मुलगी आहे. आज संपूर्ण परिवार शोकाकूल आहे.
वाचा – 3 महिन्याच्या बाळाचं अजून बारसंही नाही, नक्षली हल्ल्यात गडचिरोलीचा जवान शहीद
पोलीस महासंचालक घटनास्थळी
दरम्यान, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे सकाळी 09:15 वा. घटनास्थळी आले. त्यांनी हल्ला झाला त्या ठिकाणची पाहणी केली. पोलीस महासंचालकांसोबत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि जिल्हाधिकारी शेखर सिंगही होते.
जांभूळखेडा परिसरात कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन
सध्या जांभूळखेडा परिसरात कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. नक्षलवाद्यांनी हा हल्ला कसा केला त्या ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
नक्षलवाद्यांचा हल्ला 15 जवान शहीद
नक्षलवाद्यांनी बुधवारी 01 मे रोजी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. शिवाय चालकाचाही मृत्यू झाला. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्रीच रस्त्याचं काम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल 30 वाहने पेटवून दिली. त्यानंतर बुधवारी पुन्हा नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून भीषण हल्ला केला.
जवनांचा मृत्यू होईपर्यंत 100 नक्षलवादी थांबले, हल्ला नेमका कसा झाला?
हल्ला नेमका कुठे झाला?
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा आणि लेंढारी गावादरम्यान ही घटना घडली. लेंढारी गावाजवळ वळण आहे, या ठिकाणी भूसुरुंग घडवला. हा जंगलाचा भाग आहे. मंगळवारी नक्षलवाद्यांनी ठेकेदारांची वाहने जाळली होती. ही घटना पाहण्यासाठी, त्याच्या तपासासाठी पोलिसांचं शीघ्र कृती दल जात होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. नक्षवाद्यांना माहित होत गाड्या जाळल्यानंतर तपासासाठी पोलीस येणार. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे सापळा लावला होता, असं म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या
जवनांचा मृत्यू होईपर्यंत 100 नक्षलवादी थांबले, हल्ला नेमका कसा झाला?
3 महिन्याच्या बाळाचं अजून बारसंही नाही, नक्षली हल्ल्यात गडचिरोलीचा जवान शहीद
गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात बीड जिल्ह्यातील जवानालाही वीरमरण
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील 2 जवान शहीद
गडचिरोलीतील शहिदांची यादी, मराठवाडा, विदर्भातील जवानांचा समावेश
जनाची नाही, मनाची लाज असेल तर राजीनामा द्या, शरद पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले
नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, मी स्वत: तिथे जातोय : पोलिस महासंचालक
गडचिरोलीत नलक्षलवाद्यांकडून भ्याड हल्ला, 16 जवान शहीद
गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ‘सी-60 फोर्स’चं ट्रेनिंग कसं होतं?
गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांना जवानांच्या खासगी गाडीची माहिती पुरवणारे गद्दार कोण?
आधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले!