ठाणे : मुंब्रा येथे एका गर्भवती महिलेला दाखल करण्यास 3 रुग्णालयांना नकार दिल्याने महिलेचा रिक्षातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Death pregnent women in mumbra). या घटनेनंतर ठाण्यासह राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या काळात रुग्णालयांच्या या असंवेदनशील आणि बेजबाबदार कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. तसेच या प्रकारातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी ही घटना ठाण्यातील मुंब्रा येथे घडली. वेळेवर उपचार मिळाले नाही म्हणून या गर्भवती महिलेला आपला प्राण गमवावा लागला. या महिलेचे नातेवाईक तिच्यावर उपचार व्हावेत म्हणून रिक्षातून वणवण फिरले. मात्र 3 रुग्णालयांना महिलेला दाखल करून घेण्यासच नकार दिला. अखेर उपचार न मिळाल्याने या महिलेचा रिक्षातच मृत्यू झाला.
या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गर्भवती महिलेचा भाऊ तिला घेऊन रिक्षात बसलेला दिसत आहे. तसेच ही महिला बेशुद्ध अवस्थेत असताना हा भाऊ तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे.
1/2 मुंब्रा में एक गर्भवती महिला बच्चे के जनम से पहले २ घंटे तक एक अस्पताल से दूसरे अस्पताल का चक्कर काटती रही औरत ने सड़क पर रिक्शॉ में ही दम तोड़ दिया? @OfficeofUT @CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @rajeshtope11 @AjitPawarSpeaks pic.twitter.com/wCehdH6Zcz
— Ram Kadam (@ramkadam) May 31, 2020
या महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार ते गर्भवती महिलेला दाखल करण्यासाठी 3 रुग्णालयांमध्ये गेले. मात्र तिन्ही रुग्णालयांना तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे या महिलेचा शेवटी उपचाराच्या प्रतीक्षेत रिक्षातच मृत्यू झाला.
एकीकडे सरकार कोरोना सारख्या महामारीशी लढण्यासाठी ठाण्यात हजारो खाटांचे हाॅस्पिटल उभारत असल्याचं सांगत आहे. तर दुसरीकडे याच ठाण्यात गर्भवती महिलेला उपाचारा अभावी आपला जीव गमवावा लागला आहे. यावरुन ठाण्यातील आरोग्य व्यवस्था किती ढिसाळ झाली आहे हेच स्पष्ट होत असल्याची टीका नागरिक करत आहेत. या प्रकरणी ठाणे महानगरपालिकेने मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.
Yes but maharashtra government is equally responsible .? What about them ? Which criminal charges should apply on them ? Pls speak about it also https://t.co/SI3rBe1q4e
— Ram Kadam (@ramkadam) May 31, 2020
दरम्यान, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी देखील या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर भाजपचे नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
ठाणे महापालिका अखत्यारिक कोविड 19 आणि नॉन कोविडसाठी आलेल्या रुग्णांना जे रुग्णालयं उपचारासाठी दाखल करुन घेणार नाही किंवा उपचार करणार नाही अशा रुग्णालयांवर महापालिका आयुक्त यांच्या आदेशाने त्या त्या रुग्णालयावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे.
हेही वाचा :
Pune Corona | जनता वसाहतीत तीन दिवसात 22 कोरोना रुग्णांची भर, दोघांचा मृत्यू
Solapur Corona | सोलापुरात 891 कोरोनाबाधित, मृत्यूदर 9.42 टक्क्यांवर
दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग, बीडमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या
Death pregnent women in mumbra