बेळगाव : अयोध्यात राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्तावरुन राजकारण तापलेलं आहे. अशातच आता भूमिपूजनाचा मुहूर्त सांगणाऱ्या पुजाऱ्यालाच जीवे मारण्याची धमकी आली आहे (Threat to priest of Ram Mandir Bhoomi Pujan ). कर्नाटकमधील या पुजाऱ्याने आपणच मंदिराचा मुहूर्त सांगितल्याचा दावा केला आहे. एन. आर. विजयेंद्र शर्मा असं या बेळगावमधील पुजाऱ्याचं नाव आहे. ते म्हणाले, “देशभरातून मला राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त बदलण्यासाठी धमकीचे फोन येत आहेत. मुहूर्त न बदलल्यास त्याचे परिणाम भोगण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.”
विजयेंद्र शर्मा म्हणाले, “मला कॉल करणाऱ्यांनी विचारलं की तुम्ही भूमिपूजनासाठी या तारखा का दिल्या आणि का या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात आहेत? मी त्यांना सांगितलं की आयोजकांनी मला मुहूर्त सांगण्याची विनंती केली आणि मी गुरु या नात्याने माझं कर्तव्य पूर्ण केलं. मात्र, धमकी देणाऱ्यांनी आपलं नाव सांगितलं नाही.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
पुजाऱ्यांनी धमकीच्या फोनबाबत तक्रार केल्यानंतर बेलगावमधील टिळकवाडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पुजाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काही पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. असं असलं तरी पुजारी विजयेंद्र शर्मा यांनी आपण अजुनही या धमकीच्या फोन कॉल्सला गंभीरपणे घेत नसल्याचं म्हटलं आहे.
राम मंदिर भूमिपूजनासाठी पुजाऱ्याने दिलेल्या 4 तारखा
वय वर्ष 75 असलेले पुजारी विजयेंद्र म्हणाले, “राममंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अयोध्येच राम मंदिर भूमिपूजनासाठी मला मुहूर्त काढण्यास सांगितले होते. मी त्यांना 29 जुलै, 31 जुलै, 3 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट हे चार मुहूर्त दिले होते.” यापैकीच 5 ऑगस्टचा दिवस निश्चित झाला. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली आहे. चोख बंदोबस्तात हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह निवडक लोकांची उपस्थिती असणार आहे.
हेही वाचा :
राम मंदिरासाठी 1 कोटी रुपये आले, कुणी पाठवले माहिती नाही, त्यावर नाव शिवसेना : राम मंदिर ट्रस्ट
मोदी आणि योगींसह केवळ 5 जण मंचावर, अयोध्येतील भूमिपूजनाचा नेमका ‘प्लॅन’ कसा?
Threat to priest of Ram Mandir Bhoomi Pujan