मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोणने 14 नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने आणि 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने लग्न केलं. हा सोहळा इटलीतील लेक कोमो याठिकाणी मोठ्या जल्लोषात पार पडला. लग्न झाल्यावर आता लवकरच रणवीर-दीपिका भारतात परतणार आहेत. या नव्या जोडप्याच्या स्वागतासाठी रणवीर सिंहच्या घराला रोषणाईने सजवण्यात आलं आहे.
रणवीर सिंहच्या मुंबईतील घराला फुलांनी आणि सुंदर अशा रोषणाईने सजवण्यात आलं आहे. घराबाहेरील झाडांवरही लाईटिंग्स केल्यामुळे सध्या चाहतेही हा सुंदर देखावा पाहण्यासाठी रणवीरच्या घराबाहेर गर्दी करताना दिसत आहेत.
ज्या प्रकारे रणवीर सिंहचे घर सजवण्यात आले आहे यावरुन मुंबईतही ग्रॅंड सोहळा पार पाडणार आहे. या वर्षाच्या मोस्ट अवेटेड लग्न सोहळ्यासाठी चाहत्यांची उस्तुकता शिगेला पोहचली होती. गुरुवारीच संध्याकाळी रणवीर आणि दीपिकाने आपले लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला काही वेळातच लाखो लोकांनी लाईकही केलं आहे. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव या दोघांवर होत आहे.
लग्न सोहळा पार पडला आहे आता भारतात परतल्यावर लवकरच दीप-वीरकडून बंगळूुरूला 21 नोव्हेंबर आणि मुंबईत 28 नोव्हेंबरला ग्रॅंड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.
रणवीर आणि दीपिकाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात ही रामलीलाच्या सेटवरुन सुरू झाली होती. यानंतर दोघे बऱ्याचदा पुरस्कार सोहळा आणि इंटरव्यू दरम्यान एकत्र दिसले. आतापर्यंत दोघांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट पद्मावतमध्ये हे दोघे एकत्र दिसले होते.