दिल्ली: नवी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सिसोदिया यांच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होत असल्याची माहिती दिल्लीच्या उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट केले आहे. (Delhi Deputy CM Manish Sisodia is suffering from Dengue)
ANI वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार “मनीष सिसोदिया यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्या रक्तातील प्लेटलेटस कमी होत आहेत”, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. ताप आणि शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे सिसोदिया लोक नायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सिसोदिया यांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
Delhi Deputy CM Manish Sisodia is suffering from Dengue & his blood platelets count is falling. He was admitted to Lok Nayak Jayaprakash Hospital in Delhi after he complained of fever & low oxygen levels. He has also tested positive for COVID-19: Office of Delhi Deputy CM pic.twitter.com/TzSfxIvTzC
— ANI (@ANI) September 24, 2020
बुधवारी मनीष सिसोदिया यांची बुधवारी(23 सप्टेंबर) दुसऱ्या वेळी कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला. नवी दिल्ली विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन 14 सप्टेंबरला आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला मनीष सिसोदिया हजर राहिले नव्हते. सिसोदिया यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी स्वत:ला विलगीकरण करुन घेतले होते.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रीमंडळातील आरोग्य मंत्री संत्येंद्र जैन यांना कोरोना संसर्ग झाला होता. मनीष सिसोदिया हे कोरोना संसर्ग झालेले केजरीवाल यांच्या मंत्रीमंडळातील दुसरे मंत्री आहेत. दरम्यान, नवी दिल्लीतील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 2 लाख 56 हजार 789 वर पोहोचली आहे.
संबधित बातम्या:
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनाने निधन
(Delhi Deputy CM Manish Sisodia is suffering from Dengue)