Farmers Protest Live: आतापर्यंत 200 जण ताब्यात

| Updated on: Apr 15, 2021 | 3:45 PM

Farmers Protest live updates : प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी झालेल्ल्या हिंसाचारात 300 पोलीस जखमी झाले आहेत.

Farmers Protest Live: आतापर्यंत 200 जण ताब्यात
दिल्ली शेतकरी आंदोलन
Follow us on

Farmers Protest live updates : राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रचंड धुमश्चक्री पाहायला मिळाली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला (Farmers tractor rally) हिंसक वळण लागलं. शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कूच केली होती. शेतकरी पोलीस झटापटीत 300 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. तर दिल्ली पोलिसांकडून 22 एफआयर दाखल करण्यात आल्या आहेत. सिंघू बॉर्डर आणि लाल किल्ल्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Jan 2021 02:38 PM (IST)

    दिल्ली पोलीस 4 वाजता पत्रकार परिषद घेणार

    प्रजासत्ताक दिनादिवशी झालेल्या हिसांचारावर दिल्ली पोलीस 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • 27 Jan 2021 01:03 PM (IST)

    माथेरानमध्ये ठेकेदाराने कामगारांचे साडे 57 लाख रुपये थकवले, 54 कुटुंबाचे उपोषण

    रायगड – माथेरानमधील कंत्राटी कामगारांचे ठेकेदाराने 57 लाख 53 हजार 932 रुपये थकवले, 54 कुटुंबाचे उपोषण सुरु, 27 महिन्यांचे ईपीएएफ, स्वच्छता अभियान मधील ज्यादा मोबदला, कमगार विमा, पे हाँलिडे, गणवेश भत्ता, चपला, रेनकोट, तीन महिन्यांचा बोनस, व्यवसाय कर, आयकर, गरीब कल्याण निधी आणि संप कालीन 18 दिवसाचे पगार अशी रक्कम सर्व ठेकेदारी कामगारांना येणे बाकी आहे


  • 27 Jan 2021 12:14 PM (IST)

    डोंबिवलीत पैशांच्या वादातून भररस्त्यात काही तरुण आपसांत भिडले

    डोंबिवली – हाय प्रोफाईल लोढा हेवन परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला, पैशांच्या वादातून भररस्त्यात काही तरुण आपसांत भिडले, भांडण सोडवण्यासाठी महिलाहीमध्ये पडली, मात्र भांडण सुरुच होते, मानपाडा पोलिसांनी भररस्त्यात राडा घालणाऱ्या दोन्ही गटातील तरुणांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल केला, या घटनेचा व्हिडीओ व्हायरस झाल्याने एकच खळबळ उडाली आहे

  • 27 Jan 2021 11:47 AM (IST)

    Farmers protest : देशाच्या अर्थसंकल्पादिवशी पुन्हा एल्गार, शेतकऱ्यांचा 1 फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा

    देशाच्या अर्थसंकल्पादिवशी पुन्हा एल्गार, शेतकऱ्यांचा 1 फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा, परिसरातील सुरक्षा यंत्रणा वाढवली

  • 27 Jan 2021 11:23 AM (IST)

    दिल्ली पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार

    दिल्ली पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार

  • 27 Jan 2021 11:21 AM (IST)

    कोई पंधेर, पन्नू आणि दीप सिद्धू या तीन लोकांनी कालची घटना घडवली: रवनीत सिंह बिट्टू

    कोई पंधेर, पन्नू आणि दीप सिद्धू या तीन लोकांना पंजाबच्या शेतकऱ्यांनी निर्देशित केलं आहे. त्यांनी कालची घटना घडवली. त्यांना मोठ्या प्रमाणात फंडिंग झालं आहे. ते लोक शेतकरी आंदोलानाला उद्धवस्त करु पाहत आहेत. सरकारनं अशा लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे, असं काँगेस नेते रवनीत सिंह बिट्टू म्हणाले आहेत.

  • 27 Jan 2021 11:18 AM (IST)

    दोन महिन्यांपासून एका समुदायाविरोधात षडयंत्र, हे शीख समुदायाचं आंदोलन नसून शेतकऱ्यांचं आंदोलन : राकेश टिकैत

    “लाल किल्ल्यावर ज्यांनी झेंडे फडकावले त्यांना शिक्षा मिळणार आहे. मागील दोन महिन्यांपासून एका समुदायाविरोधात षडयंत्र रचलं जात आहे. हे शीख समुदायाचं आंदोलन नसून शेतकऱ्यांचं आंदोलन आहे” : राकेश टिकैत

  • 27 Jan 2021 11:14 AM (IST)

    टीव्ही 9 मराठी LIVE TV

    टीव्ही 9 मराठी LIVE TV

  • 27 Jan 2021 11:12 AM (IST)

    हिंसाचारात 300 पोलीस जखमी; दिल्ली पोलिसांची माहिती

    नवी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारमध्ये 300 पोलीस जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांकडून पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता आहे. क्राईम ब्रँचकडे हिंसाचाराचा तपास सोपवला जाण्याची शक्यता आहे.