नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या फुफ्फुसात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाच्या कार्यालयाने दिली आहे. (Delhi Health minister Satyendar Jain on oxygen support)
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचा कोरोना अहवाल बुधवारी (17 जून) पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल त्यांच्या प्रकृतीत थोड्या प्रमाणात सुधारणा झाली असली तरी त्यांचा ताप कमी झालेला नाही. एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.
तर रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी 18 जूनला त्यांचा ताप कमी झाला. मात्र त्यांच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एकंदरीत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे बोलल जात आहे.
Delhi Health Minister Satyendar Jain, who has tested positive for COVID19, put on oxygen support after his lung infection increases: Office of Delhi Health Minister
(file pic) pic.twitter.com/RLnOeky0W4— ANI (@ANI) June 19, 2020
दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाची टेस्टही केली होती. मात्र ती टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र 15 जूनला त्यांना अचानक श्वास घेण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर त्यांचा तापही वाढला. यानंतर पुन्हा एकदा त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी विविध बैठकांनाही हजेरी लावली होती. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची तपासणी केली जात आहे. तसंच या व्यक्तींना होम क्वारंटाईनचा सल्लाही देण्यात आला आहे. (Delhi Health minister Satyendar Jain on oxygen support)
संबंधित बातम्या :
Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलला
Delhi health minister Satyendra Jain : दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोना, आप आमदारालाही लागण