नवी दिल्ली : दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, यावेळी अत्यंत मोजक्या व्यक्तिंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या सर्वांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून 15 ऑगस्ट आधीच 350 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Delhi Police quarantine 350 staff). यात पोलीस हवालदारापासून पोलीस उपायुक्तांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा बाहेरील व्यक्तींशी संपर्क येऊन कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे.
दिल्लीतील नविन पोलीस कॉलनी येथे या पोलीस कर्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांना आपल्या कुटुंबांपासून देखील दूर ठेवण्यात आलं आहे. तसेच कुणाशीही संपर्क न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे सर्व कर्मचारी स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यापासून त्यांच्या इतर व्यवस्था पाहणार आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
संबंधित 350 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कॉन्स्टेबलपासून डेप्युटी पोलीस कमिश्नर रॅंकपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांची दररोज कसून शारीरिक तपासणी केली जात आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या लक्षणांचीही पाहणी केली जात आहे. त्यांना पोलीस कॉलनीबाहेरील कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना गार्ड ऑफ ऑनर देणारे अधिकारी
15 ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकावणार आहेत. या विशेष कार्यक्रमात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात येणार आहे. यावेळी या कार्यक्रमात अत्यंत निवडक आणि महत्त्वाच्या व्यक्तींनाच आमंत्रित करण्यात आलं आहे.
हिंदूस्थान टाईम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं, “स्वातंत्र्य दिनाच्या दिवश कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा आणि सर्वांची सुरक्षा पाळली जावी म्हणून या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व आवश्यक ती काळजी घेत आहोत. या सर्वांना क्वारंटाईनमध्ये ठेऊन 8 पेक्षा अधिक दिवस झाले आहेत. हे सर्व अधिकारी शारीरिक अंतर आणि इतर महत्त्वाचे सर्व नियम पाळत आहेत. त्यांच्यापैकी कुणालाही कोणतंही लक्षण नाही.”
विशेष पोलीस आयुक्त रॉबिन हिबू हे या सर्व व्यवस्थांची देखरेख करत आहेत. त्यांना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, सुरक्षेचा मुद्दा असल्याने त्यांनी याबाबत कोणतीही माहिती सांगण्यास नकार दिला. या कार्यक्रमात अनेक महत्त्वाच्या व्यक्ती येत असल्याने पोलीस कोणतीही सुरक्षेची जोखीम घेण्यास तयार नाहीत.
एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं, “350 कर्मचाऱ्यांमध्ये ते सर्व अधिकारी आहेत जे पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देणार आहेत. आमच्याकडे प्रत्येक व्यक्तीसाठी पर्यायी माणसं आहेत. गार्ड ऑफ ऑनरसाठी डीसीपी रँकच्या केवळ दोन परेड कमांडरची गरज आहे. मात्र, खबरदारी म्हणून अशा 4 अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. आम्हाला कोणतीही जोखीम पत्करायची नाही. यापैकी कोणतीही व्यक्ती कोरोना किंवा इतर कोणत्याही आरोग्यविषयक अडचणीत सापडली, तर तात्काळ राखीव पोलीस अधिकाऱ्यांचा उपयोग केला जाईल.”
हेही वाचा :
Rajnath Singh | संरक्षण मंत्रालयाचे आत्मनिर्भर पाऊल, 101 सामुग्रींवर आयातबंदी, राजनाथ सिंहांची घोषणा
शरद पवारांचा झंझावाती दौरा, कराडमध्ये कोरोना आढावा बैठक
‘आधी नोटीस, मग अॅक्शन’, तुकाराम मुंढेंचे व्होकार्डला 2 दिवसात अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश
Delhi Police quarantine 350 staff