नवी दिल्ली : दिल्लीच्या एका पोलीस उपनिरीक्षकाने प्रेयसीवर गोळी झाडल्याची घटना घडली (Police Sub-Inspector Shoots Girlfriend). सध्या जखमी प्रेयसीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर या पोलीस उपनिरीक्षकाने हरियाणाच्या रोहतकमध्ये सासऱ्याची हत्या केल्याचीही माहिती आहे. तेव्हापासून हा पोलीस उपनिरीक्षक फरार आहे. संदीप दहिया असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे (Police Sub-Inspector Shoots Girlfriend).
संदीप दहियाने त्याच्या सर्विस रिव्हॉलव्हरने या दोघांवरही गोळ्या झाडल्या आणि फरार झाला. सध्या पोलीस त्यांच्या मागावर आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिया त्याच्या पत्नीचा खून करण्याच्या उद्देशाने तिच्या घरी रोहतकला गेला होता. मात्र, त्याऐवजी त्याने तिचे वडील रणवीर सिंगवर गोळ्या झाडल्या, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
संदीप दहिया या 36 वर्षीय पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भांडण सुरु होतं, त्यामुळे ते वेगवेगळे राहात होते, अशी माहिती आहे (Police Sub-Inspector Shoots Girlfriend).
गेल्या एका वर्षापासून दहियाचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते. या महिलेवरही दहियाने रविवारी गोळी झाडली. रविवारी उत्तर दिल्लीच्या अलीपूर भागातील जीटी करनाल रोडवरील रस्त्याच्या कडेला या दोघांमध्ये भाडण झालं. या भांडणादरम्यान दहियाने प्रेयसीवर गोळी झाडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिया आणि त्याच्या प्रेयसीमध्ये कारमध्ये भांडण सुरु होतं, तेव्हा त्याने तिला गोळी घातली. यादरम्यान, तिथून जात असलेले पोलीस उपनिरीक्षक जयवीर यांनी या महिलेला वाचवलं.
“या महिलेला जवळच्या रुग्णालयात नेत असताना तिने सांगितलं की, तिला पोलीस उपनिरीक्षक दहिया यांनी गोळी मारली. जे लाहौरी गेट पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत”, अशी माहिती पोलिस उपायुक्त गौरव शर्मा यांनी दिली. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे. तसेच, आरोपी उपनिरीक्षकावर भारतीय दंड विधान संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशीही माहिती गौरव शर्मा यांनी दिली.
संदीप दहिया 2010 बॅचचे पोलीस उपनिरीक्षक आहे. ते लाहौरी गेट पोलीस ठाण्यात तैनात होते.
ठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या https://t.co/RWcpJSicqj
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 27, 2020
Police Sub-Inspector Shoots Girlfriend
संबंधित बातम्या :
गळफास नव्हे, गळा कापून आत्महत्या, मिरजेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचं थरारक कृत्य